समर्पित आयोगाच्या भेटीसाठी नोंदणी करण्याची शुक्रवारला शेवटची मुदत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26:-ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्ग यातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने शनिवार 28 मे 2022 ला सायंकाळी साडे चार ते सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेला समर्पित आयोग नागरिकांची मते जाणून घेणार आहेत .या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना आपली मते मांडता यावीत आणि निवेदन देता यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यलयात आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.ही नोंदणी शुक्रवार 27 मे ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार असून ही शनीवारला येणाऱ्या समर्पित आयोगाच्या भेटीची शेवटची संधी राहणार आहे तेव्हा इच्छुकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात संपर्क साधून लेखी नोंदणी करावी असे आव्हान कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले आहे.
कामठी तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, ग्रामपंचायत , पंचायत समिती , नगरपंचायती च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती)आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेला समर्पित आयोग शनिवार 28 मे ला विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची मते जाणून घेणार आहेत .तेव्हा या भेटीसाठी उद्या शेवटच्या मुदतीत सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करून आपली मते मांडावीत असे आव्हान तहसीलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे, मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!