जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

शासनाने जाहीर केले होते 02लाख रूपयांचे बक्षीस.

गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई

गडचिरोली – पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणा­या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. 14/01/2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ 191 बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.
नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहीवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय 30 वर्षे पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र. 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्य होता.
सन 2008 रोजी पोस्टे भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता, उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन 2010 रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहीवासी चुक्कु याच्या खुनात सक्रीय सहभाग होता. सन 2009 रोजी उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील मौजा गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याचबरोबर दि. 14/08/2020 रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात त्याचा सक्रीय सहभाग होता. दि. 11/06/2020 रोजी किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन 2021 मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅकमध्ये तसेच दि. 18/09/2021 मध्ये रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये, दि. 26/02/2021 रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व दि. 03/04/2021 रोजी रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता तसेच दि. 11/01/2022 रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्रात सहभागी होता. जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असुन त्याच्यावर खालील प्रमाणे एकुण 16 गुन्हे दाखल होते.

गुन्हे संख्या
खुन 06
चकमक 04
दरोडा 02
जाळपोळ 03
अपहरण 01
एकुण 16

. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 02 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्रांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.
सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा.यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.अपर पोलीस अधिक्षक (अभियान) श्री.सोमय मुंडे सा.मा.अपर पोलिस अधिक्षक(प्रशासन) श्री.समीर शेख सा.मा.अपर पोलिस अधीक्षक श्री.अनुज तारे सा.यांच्या नेतृत्वात पार पडले.मा.पो.अधिक्षक सा.यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

सतीश कुमार 

गडचिरोली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

PRELIMINARY FINDINGS OF COI: HELICOPTER ACCIDENT ON 08 DEC 2021

Fri Jan 14 , 2022
14 january 2022 – The Tri-Services Court of Inquiry into the Mi-17 V5 accident on 08 Dec 21 has submitted its preliminary findings. The inquiry team analysed the Flight Data Recorder and Cockpit Voice Recorder besides questioning all available witnesses to determine the most probable cause of the accident. The Court of Inquiry has ruled out mechanical failure, sabotage or […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!