दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांची  ‘अनुभवात्मक आणि जबाबदार पर्यटन’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावर आणि न्यूज ऑन एअर या अँपवर शनिवार दि. 31 डिसेंबर 2022 आणि सोमवार दि. 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास संकुल येथे  नववर्षानिमित्त पर्यटकांसाठी  राबविण्यात येणारे अनुभवात्मक पर्यटन उपक्रम,नुकताच झालेल्या नाताळ सणासाठी एमटीडीसीने  पर्यटकांसाठी दिलेल्या सोयी-सुविधा, निवास न्याहरी आणि महाभ्रमण योजना, पर्यटक निवासी संकुल साठी कशाप्रकारे बुकिंग करता येते, जबाबदार पर्यटन,एमटीडीसी मार्फत राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी मदत, पर्यटन जनजागृती उपक्रम याविषयी सविस्तर माहिती, ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाव्यवस्थापक जयस्वाल यांनी दिली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com