महागाईचा कहर! साबणाच्या दरात तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढ, कारण…

मुंबई :- रोजच्या वापरातील वस्तूंचे दर वाढले की त्याचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो. कारण, हे रोजच्या जीवनाशी निगडीत असतं आणि त्यावरच आपला अधिक खर्च असतो. दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किंमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे.

साबणाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ

स्वयंपाक घरानंतर म्हणजे स्वयंपाकाचे तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळे यांच्यापाठोपाठ महागाई बाथरूमकडे सरकली आहे. ही काही गंमतीशीर गोष्ट नाही. चालू तिमाहीत आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ज्या पाम तेलापासून साबण तयार केला जातो. त्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साबणाच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे. ज्यामुळे देशातील FMCJ कंपन्यांनी आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत वाढ केली आहे.

किंमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या

दैनंदिन वापरातील उत्पादक HUL आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किमती तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे. अनियमित हवामानामुळे उत्पादन घटल्याने HUL आणि टाटा कन्झ्युमर सारख्या कंपन्यांनीही अलीकडे चहाच्या दरात वाढ केली आहे.

सप्टेंबर तिमाहीच्या निकालादरम्यान अनेक सूचीबद्ध कंपन्यांनी आपले मार्जिन वाचविण्यासाठी चालू तिमाहीत साबणाच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले. या कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोकोच्या किंमतीतही वाढ होत आहे.

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ

विप्रो कन्झ्युमर केअरचे सीईओ नीरज खत्री म्हणाले, ‘साबण निर्मितीतील प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात 30 हून अधिक वाढ झाली आहे. परिणामी, सर्व प्रमुख कंपन्यांनी ही वाढ अंशत: भरून काढण्यासाठी सुमारे 7 ते 8 टक्क्यांनी किंमती वाढवल्या आहेत. अझीम प्रेमजी यांच्या विप्रो एंटरप्रायझेसचे युनिट असलेल्या विप्रोकडे संतूरसारख्या ब्रँडचा मालक आहे.

देशातील सर्वात मोठी FMCJ कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनेही चहा आणि स्किन क्लिंजर उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये डव्ह, लक्स, लाईटबॉय, लिरिल, पियर्स, रेक्सोना आदी ब्रँडअंतर्गत साबणाच्या व्यवसायाचा समावेश आहे. आयात शुल्कवाढीसह जागतिक किमती वाढल्याने सप्टेंबरच्या मध्यापासून पाम तेलाच्या किंमती तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पाम तेल कुठून आयात केले जाते?

पाम तेल प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियातून आयात केले जाते. सध्या पाम तेलाचा दर 1370 रुपये प्रति 10 किलो आहे. याशिवाय HUL च्या इतर पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या किमतीही वाढल्या आहेत, अशी माहिती एका वितरकाने दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

साईबाबा आश्रमशाळा टेकाडी चे विद्यार्थी व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेता

Mon Dec 2 , 2024
कन्हान :- आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मि क आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपुर व्दारा आयोजित १८ व्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत साई बाबा आश्रमशाळा टेकाडी च्या विद्यार्थीनींनी १४, १७ व १९ वर्षे वयोगटात खेळुन अंतिम सामन्यात विजय श्री प्राप्त केल्याने संघाचे कौतुक करून अ़भिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपुर व्दारे आयोजित १८ व्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!