जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारतात – राज्यपाल बैस

व्यक्ती निर्माण, समाज निर्माण, राष्ट्र निर्माण हाच अश्वमेघ यज्ञाचा संकल्प : सुधीर मुनगंटीवार

गायत्री परिवाराच्या ४८व्या अश्वमेध महायज्ञ स्थळाचे भूमिपूजन

मुंबई :-  भारत देश आध्यात्म आणि संस्कृतीचे माहेरघर आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आणि विद्वत्ता भारताच्या आध्यात्मात आहे. गायत्री परिवार यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. जगाच्या कल्याणासाठी गायत्री परिवाराचा अश्वमेध यज्ञ उपयुक्त ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.

मुंबईत गायत्री परिवार आयोजित अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार शाखा मुंबई द्वारा ४८ व्या अश्वमेध महायज्ञ निमिताने आयोजित भूमिपूजन समारंभात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, गायत्री परिवारचे डॉ. चिन्मय पंड्या, हिरानंदानी, राधिका मर्चंट, जिल्हाधिकारी योगेश मसे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणले की, माणुस स्वत: बाह्यअंगाने स्वतः ला सुंदर करू शकेल. परंतु त्याला मनापासून सुंदर आणि सुशिल बनविण्यासाठी व्यक्ती निर्माण, समाज निर्माण आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे. चांगली व्यक्ती चांगले राष्ट्र निर्माण करू शकतो आणि चांगले राष्ट्र चांगल्या युगाचा इतिहास घडवू शकतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यात गायत्री परिवारातील प्रत्येकाचे स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या रायगड जिल्ह्याच्या भूमिवर हा महायज्ञ होत असल्याबद्दल आनंद वाटतो. २ जूनला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक दिन साजरा केला. त्यानंतर लागलीच अश्वमेध महायज्ञाचे आयोजन म्हणजे दुर्मिळ योग असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले. जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेपुढे मांडले होते. त्याच विचारांना पुढे नेण्याचा पवित्र संकल्प गायत्री परिवाराने केल्याबद्दल समाधान वाटते. शिवरायांच्या पवित्र भूमित अश्वमेध यज्ञ होणे यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी असून शकत नाही, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

पूर्वी अश्वमेध यज्ञ इतर राज्य जिंकण्यासाठी केले जायचे. परंतु आताचा महायज्ञ राष्ट्र कल्याणासाठी केला जात आहे. राष्ट्र प्रथम ही भावना सर्वतोपरी आहे, असे ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले. या महायज्ञातून लोकांची मने जिंकली जातील. गायत्री अश्वमेध महायज्ञाबद्दल ना. मुनगंटीवार यांनी यावेळी डॉ. चिन्मय पंड्या यांचे कौतुक केले. मुंबई ही सर्वांसाठी मातेसमान आहे. त्यामुळे या ठिकाणी अश्वमेध महायज्ञाचा निर्णय घेणे खरोखर स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. विश्वातील अनेक देशातून भाविक या यज्ञासाठी यावे असे नियोजन करण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे पवित्र कार्य गायत्री परिवार करीत आहे, असे मत ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

भारतासारख्या पुण्यभूमित जन्म घेणे हे सर्वांसाठी सौभाग्याचे लक्षण असल्याचे नमूद करीत ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मृगाच्या पोटात कस्तुरी असते. परंतु त्याला त्याची जाणीव नसते. आपली अवस्थाही तशीच झाली आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे. परदेशात तरुणाई आध्यात्मिक मार्गावर चालत आहे. परंतू आपल्याकडे तरुणाईच्या मनात विषारी विचारांची आणि संस्कृतीची पेरणी होत आहे. अशात गायत्री परिवारासारखे कुटुंब समाज निर्मितीसाठी मोठे योगदान देणारे ठरेल असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ‘वसुधैव कुटुंबकम्’नुसार आपण केवळ आपला विचार नाही करत, तर संपूर्ण विश्वाचा विचार करतो आणि हा विचार केवळ आपल्या आध्यात्मामध्ये आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आध्यात्मिक गंगा प्रवाहित होईल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमितून होणारा अश्वमेध महायज्ञ देशातच नव्हे तर विश्वात आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांच्या गंगेला प्रवाहित करेल. या यज्ञाच्या माध्यमातून प्रत्येकाला नवे बळ मिळेल. धनाने तनाला समाधान मिळते. परंतु आध्यात्माने मनाला समाधान नक्कीच मिळेल, असा ठाम विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Padma Awardees from Maharashtra felicitated 

Mon Jun 5 , 2023
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais today felicitated the Padma Awardees from Maharashtra at a public reception held at Raj Bhavan Mumbai on Sun (4 June). The public felicitation was organised by the Vasantrao Naik Agricultural Research and Rural Development Foundation. Padmabhushan recipient Dr Deepak Dhar and Padmashri recipients Bhikuji Idate, Dr Parshuram Khune, Dr Gajanan Mane, Ramesh Patange and Guru […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com