संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विवाह हा दोन जीवांचा आयुष्यभर सोबत राहण्याचा एक सुंदर अविष्कार आहे.कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न म्हणून नापसंत वधू -वराला होकार द्यावा लागतो त्यानुरूप जोडीदारासह वौवाहिक जीवन व्यतीत करत असताना आधुनिक जीवनशैली ,वाढता ताणतणाव ,आर्थिक अडचणी यातून उदभवणारे कौटुंबिक वाद यामुळे दोघांच्या नात्यात वितुष्ट निर्माण होत आहे.हे वितुष्ट समेटाने मिटत नसल्याने आधुनिक युगातील नवविवाहित जोडपे वर्षभराच्या आत घटस्फोटाचा निर्णय घेत आहे.
आज आधुनिक युगात मुख्यत्वे शिक्षण आणि नोकरीवर लागल्या नंतरच लग्नकार्य केले जाते.तोपर्यंत मुला मुलीचे वय बरेचसे उलटून गेलेली असतात दरम्यान कित्येक तरुण तरुणी हे मैत्रिरुपी संबंधाला प्रेमप्रकरणाचे रूप देत जीवनभराचे साक्षीदार होण्याच्या आकाभाका घेतात मात्र कुटुंबातील मोठ्यांचा आदर व प्रतिष्ठा कायम ठेवत स्वतःच्या प्रेमाचे बलिदान देत आई वडिलांनी ठरविलेल्या वधू वरांशी लग्न करण्याची संमती दर्शवून विवाह बंधनात अडकतात.परंतु अशा वैवाहिक जीवनात येत असलेल्या अडचणी व असामंजसयामुळे पती पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढत जाते .अखेर पती पत्नीमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ येत असते यामुळे अनेकांच्या कुटुंबावर आर्थिक बोझा पडत असतो.आपला जोडीदार समजूतदार असावा अशी प्रत्येक मुला मुलींची अपेक्षा असल्याने प्रेम विवाहाची संख्या वाढत आहे.कित्येकजण तर परिस्थितीनुसार आई वडिलांच्या प्रेमाच्या तुलनेत प्रियकराच्या प्रेमाला बाजूला सारत अरेंज मॅरेज ला मान्य करीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत असे करूनही अनुरूप व समजूतदार जोडीदार मिळत नसल्याने मुला मुलींचे जीवन फसगत झाल्यासारखे होत आहे.अशावेळी दोघांच्या वैवाहिक जीवनात वाढतं असलेल्या कलहात नवविवाहिताना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे.
मोठया हौसेने ,दिमाखात लग्न लावून दिल्या नंतर काही दिवसातच समोर येत असलेल्या अडीअडचणी या व या त्रासाला दोन्हीकडील परिवारात मोठ्या प्रमानावर अडचणी येत आहेत मात्र असे घडतेच का?व यामागील कारणे कुठली याचा विचारही तेवढाच समांजस्याणे होण्याची अपेक्षा असतानाही सतत वाढणाऱ्या या घटनामुळे समाजात भविष्यात ही एक मोठी समस्या चिंतनाची बाब ठरू पाहत आहे.