जगायचे तर शिवरायांसारखे शौर्याने व मरावे छत्रपती संभाजी राज्यांसारखे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- मराठा सेवा संघ कन्हान द्वारे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य जगायचे तर शिवरायांसारखे शौर्याने आणि मरावे छत्रपती संभाजी राज्यांसारखे चा संदेश देत जयंती थाटात साजरी करण्यात आली.

मराठा सेवा संघ कार्यालय राम नगर कन्हान येथे राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व महापुरूष आणि छात्रवीर राजे संभाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते मालार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक शिवश्री शांताराम जळते यांनी संभाजी महाराज यांनी समाजासाठी केलेला त्याग आपल्या वक्तव्यातुन समजावुन सांगितले. संभाजी महाराजांना अगदी लहान वयातच मोगलांनी केलेले आक्रमनाचा सामना करावा लागला. संभाजी राजांनी केलेल्या लढ्याया. मोगलावर वचक निर्माण करून औरंजेबावर दहशत निर्माण केली. संभाजी कडील काही मंडळी फितपर झाली. त्या कारणाने संभाजी औरंजेबाच्या तावडीत सापडले. संभाजी राजांनी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासा ठी स्वतःचे बलिदान दिले, आपल्या राज्यातील गुपिते सांगितले नाही. म्हणुन जगायचे तर शिवरायांसारखे व मरावे तर संभाजी राज्यांसाखे असे शांताराम जळते हयांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष शिवमती माया इंगोले यांनी जिजाऊ, शिवराय, संभाजी राजे यांचे विचार लक्षात घेऊन तरुणांनी समाजाला जागृत करावे असे आवाहन केले. संदीप कुकडे यांनी संघटना वाढीसाठी समाज बांधवानी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे गायक कलाकार राकेश घोडमारे यानी तर आभार संदीप कुकडे यानी मानले. कार्यक्रमास मराठा सेवा संघांचे ताराचंद निबाळकर, विठ्ठल मानकर, वसंतराव इंगोले मोतीराम रहाटे, शिवशंकर वाकुडकर, चंद्रशेखर ठवकर, मनिष, काकडे, राजेंद्र गाडगे, योग प्रशिक्षण जितेंद्र चौधरी, निखिल पाटील, राकेश सावरकर, जिजाऊ ब्रिगेड च्या शिवमती लता जळते, बी आर एस पी चे प्रविण सतदेवे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात वृद्धांचे आयुष्य वाढेल वयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri May 16 , 2025
रत्नागिरी :- निसर्गसंपन्न असणाऱ्या वृद्धाश्रमात येणाऱ्या वृध्दांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!