– संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
– जलसंधारण क्षेत्रात विशेष कामगिरी
नागपूर १४ जाने :- तरुणांना करियरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या,तसेच लोकसहभागातून ग्रामविकासाची चळवळ चालविणाऱ्या रोजगार संघाचा ९ वा वर्धापन दिन गुरुवार दि १२ जाणे ला विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला होता.यावेळी वृक्षसखा पुरस्कार,सरपंच सत्कार,करियर गायडन्स व भरारी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमात बोरखेडी (रेल्वे) चे सरपंच राजू घाटे यांनी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत जलसंधारण क्षेत्रात विशेष कामगिरी केल्यामुळे त्यांना सन्माचिन्ह देऊन गौरन्वित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते,अध्यक्ष म्हणून रोजगार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय नाथे,प्रमुख अतिथी म्हणून नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ कमलकिशोर फुटाणे हे होते. डॉ फुटाणे यांनी उपस्थित तरुणांना करियर,सरपंच यांना वृक्षलागवड,संवर्धन,जलसंवर्धन याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.यावेळी वृक्ष लागवड व संवर्धनाकरिता वृक्षसखा पुरस्कार,ग्रामीण भागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा सत्कार तसेच शाश्वत विकासावर आधारित रोजगार संघाच्या भरारी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.याच कार्यक्रमात तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथील सरपंच राजू घाटे यांनी जलसंधारण क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करून गौरन्वित करण्यात आले.सरपंच राजू घाटे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अशोक मानकर,सतीश धुर्वे,सागर घुगल,सावळा लष्करे सचिव शिवाजी काकडे यांनी अभिनंदन केले.