यवतमाळ :- शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १०० दिवस क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहिम ७ डिसेंबर ते २४ मार्च म्हणजे पर्यंत जागतिक क्षयरोग दिनापर्यंत चालणार आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय परिसरातील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे या मोहिमेचे उद्घाटन झाले.
जिल्हाधिकारी, डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शोध मोहिमेच्या उद्घाटनाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुखदेव राठोड, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आशिया, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तनवीर शेख, प्राध्यापक व क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र राठोड, आयएमएचे सचिव डॉ. शरद राखुंडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सागर जाधव, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन खरोडे उपस्थित होते.
या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षयरुग्णांचा मृत्युदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे, क्षयरोग तसेच समाजातील क्षयरोगाविषयी जनजागृती करुन सामाजिक कलंक कमी करण्याचा उद्देश आहे.
जिल्हा क्षयरोग विभागाच्या माध्यमातुन ही शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. पुढील शंभर दिवस शहरी तसेच ग्रामीण भागातील कारखाने, वृध्दाश्रम, अनाथाश्रम, निवासी शाळा, कारागृहात तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षावरील नागरीक, मधुमेहग्रस्त, कर्करोगग्रस्त, पिएलएचआयव्ही, मागील २ वर्षात निदानित क्षयरुग्ण, स्थालांतरीत, उसतोड कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग, वंचित घटक आदी ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले जाणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सागर जाधव यांनी केले. संचलन रुपेश फुसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे आशिष देशमुख, अस्लम खान, सुरेश दांडगे, दिनेश चोरमले, एम. डी. राठोड, यन्नावार, मडावी, बालाजी कदम, डोंगरे, कविता सरोदे, भावेकर, जैस्वाल, आकाश टाक, दराडे, मेश्राम, शिवदास श्रीरामे, शैलेश देशमुख, कोंढावे तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.