– श्री हनुमान सेवा पंच कमिटी शिवशक्ती नगर नं. 2 व 3 च्यावतीने हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर :- दक्षिण नपुरातील श्री हनुमान सेवा पंच कमिटी शिवशक्ती नगर नंबर 2 व 3 मानेवाडा रिंग रोड नागपूर येथे मंगळवारी 23 एप्रिल रोजी, श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी सकाळी 6:00 वा. पूजा अभिषेक (हनुमान जन्म) दुपारी 3:00 वाजता. भजन व गोपालकाला सायंकाळी 7:00 वाजता. भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच वस्तीतील नागरिकांनी सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असून मंदिरात धान्य व इतरही काही दान करायचे असल्यास मंदिरात देणगी स्वीकारल्या जाईल. शिवशक्ती नगरातील कार्यकर्ते हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने परिश्रम घेत आहे. असे श्री हनुमान सेवा पंच कमिटी च्यावतीने प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.