“मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त कविता स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

– छत्रपती शिवाजी महाराज स्तुतीगीत ते मनाचे श्लोक सादर केले अमराठी भाषिक विद्यार्थ्यांनी

नवी दिल्ली :- राजा शिव छत्रपती शिवाजी……, मनाचे श्लोक……, मराठी महिन्यांच्या महत्व सांगणारी कविता, माझ्या पप्पांनी गणपती आणला… बहीण माझी छोटीशी…. अशा सुप्रसिद्ध मराठी कविता, गाणे अस्खलितपणे अमराठी भाषिक विद्यार्थ्यांनी कविता स्पर्धेत सादर केल्या.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील नुतन मराठी शाळेत कविता स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंतच्या एकूण 20 विद्यार्थी सहभागी झालेत. शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका वर्षा बावने आणि सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता.

अमराठी भाषिक असणाऱ्या या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून गेय स्वरूपात मराठी कविता उत्तम रीतीने सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

इयत्ता आठवीच्या वर्गातील निखल या विद्यार्थ्यांने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज….. या कवितेचे पठन अभिनयासह उत्कृष्टपणे सादरीकरण केले. इयत्ता आठवीतील तन्मय याने आई करना ग भेळ…. ही बाल कविता बाल अभिनयासह सादर केली. तो व्दीतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. इयत्ता सहावीतील अनु या विद्यार्थीनीने मराठी महिण्यांचे महत्व सांगणारी कविता गेय पद्धतीने उत्साहात सादर केली. तर इयत्ता सातवीतील आकांक्षी हीने माझ्या पप्पांनी गणपती आणला….. हे प्रसिद्ध गाण सादर केले. या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

या कविता स्पर्धेस परीक्षक म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक भागवंती मेश्राम आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्य मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Fri Jan 24 , 2025
नागपूर :- “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा” भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला उत्पन्न करणारी घोषवाक्य देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र महान स्वातंत्र्य सैनानी, थोर क्रांतीकारक, भारतरत्न, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे गुरुवारी (23) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!