संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 959 नागरिकांना चष्म्यांचे वाटप
– खा. कृपाल तुमाने शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे आयोजन
नागपूर :- हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपालजी तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे भव्य शिबिराचे करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत चष्मेही वाटप करण्यात आले.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षामार्फत जिल्हाभर आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात आले. आरोग्य शिबिरात 1205 रूग्णांनी नोंदणी केली. तर 959 रूग्णांना चष्मे वाटप आणि 253 रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. त्याचबरोबर 35 नागरिकांचे आयुष्यमान कार्ड बनवण्यात आले. शिबिरात नेत्ररोग, मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग यासारख्या आजारांच्या तपासण्या आणि उपचार करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मांचे सुद्धा वाटप करण्यात आले. ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल मधे ऑपरेशन करिता नेण्याची व परत आणण्याची आणि इतर सर्व व्यवस्था देखील खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, उपजिल्हाप्रमुख विनोद सातंगे, सहसंपर्कप्रमुख दिवाकर पाटणे, वैद्यकीय कक्ष समन्वयक सुरेंद्र गिरी,अमित कातुरे जिल्हा परिषद सदस्य अमित उंबरे, तालुकाप्रमुख विठ्ठल नगराळे, प्रतिभाताई पोपसे, अनिल गोलकुंडवार, अमोल ढोरे, अजय फटिंग, धनराज चरडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.