खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी २ फेब्रुवारीला

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आली आहे.

महाअंतिम फेरीचा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता होईल. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, महिला आघाडी अध्यक्ष प्रगती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असेल.

७ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी स्पर्धेत नागपुरातील ६ विभागांतील ५८३ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व भजनी मंडळींद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा जागर करण्यात आला. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत विजेत्यांना २० भव्य रोख पारितोषिक देण्यात येईल. ज्येष्ठ वयोगटात १२ पुरस्कार आहेत. सात रोख पुरस्कार आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील. खासदार भजन स्पर्धेत नागपुरातील सहभागी ५८३ भजनी मंडळांना प्रत्येकी १५००/- रुपये मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे. खासदार भजन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, सपना सागुळले, श्वेता निकम, श्रधा पाठक, रेखा निमजे, विजय येरणे, दर्शना नखाते, सुजाता कथोटे, अभिजित कठाले, ढबले, अतुल सगुळले आदी पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती

Fri Jan 31 , 2025
– दहाही झोनमध्ये अभियानाला उदंड प्रतिसाद नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचा शुभारंभ केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व समाज कल्याण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!