अंधश्रद्धेचा कहर; काळ्या धनाच्या नावावर महिलेची लुट…सापळा रचत पोलिसांनी केले तिन आरोपीस अटक..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील सालई गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी तालुक्याच्या सालई ( फुटाना) गावातील खेलनबाई मधुकर सलामे यांचा घरात काळा धन असल्याचेे सांगत सुरेश नारायण गिरी (५१), अरविंद सुरेश गिरी (२२), रामदास शंकर पुरी (५८), तिन्ही राहनार सांनगडी ता.सानगडी, जि. भंडारा यानीं महिलेला फसवत ८५,००० हजार रुपये गटकले आहेत. सदर घटनेची तक्रार महिलेनी देवरी पोलिस स्टेशनला केली असुन पोलिस निरीक्षक रेवचंद सिगंनजुडे यानीं चक्र फिरवत तिन्ही आरोपीनां सौदंड येथुन ताब्यात घेतले आहेे. तिन्ही आरोपीवर २८९/२०२२ कलम ४२०, ५०८, ३४ भादंवि सह कलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अतंर्गत गुन्हा दाखल केला  असुन आरोपीनां ताब्यात घेतला आहे. तिन्ही आरोपीकडुन देवरी पोलिसानीं एकुन १,५२,०००/रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com