कुंभारे कॉलोनीतून गांजा विक्रेत्यास अटक,1 किलो 214 ग्राम गांजा जप्त..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 25 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या क्वार्टर क्र 56 वर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही गतरात्री 9 दरम्यान केली असून या धाडीतून 1 किलो 200 ग्राम गांजा किमती 24 हजार 568 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाहितुन आरोपी हाफिज खान मोहम्मद खान वय 42 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले पसार आरोपीचे नाव देवा उर्फ देवलाल सूर्यवंशी वय 35 वर्षे रा वलणी खदान असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड, एसीपी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, दुय्यम पोलीस निरीक्षक गड्डीमे,एपीआय जीवन भातकुले , पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, डी बी स्कॉड चे संदीप सगणे आदींनी केले असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

माजी नगरसेवकाच्या तक्रारीवरून माजी नगरसेविका पुत्र व बंधू विरोधात गुन्हा दाखल..

Thu Aug 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 25 :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 3 मध्ये झालेल्या सिमेंट रस्ता बांधकामाचा मिळकत असलेला कंत्राटी 50 टक्के प्रमाणात नफा न देता गुंतवणुकीत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सुदधा सोडवून न देता माजी नगरसेवकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायिक हक्कासाठी न्यायालयात केलेल्या अर्जावर न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम यांच्या तक्रारीवरून प्रभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com