संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
अवैद्य कोळसा टाल वरून १९२०० रूपयाचा कोळसा जप्त करून ३ आरोपीवर गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच किमी अंतरावरील गाडेघाट- पिपरी शिवारातील राणी बगीच्या जवळ अवैध कोळसा टालवर कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी धाड टाकुन तिथे १९२०० रूपया चा चोरीचा अवैध कोळसा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे हे २३ जुलै ला कर्तव्यावर हजर असतांना सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी रविकांत कंडे यांना फोन करून कळविले कि गाडेघाट शिवार राणी बगीच्या जवळ झाडीझुडपी मध्ये अंदाजे ८ ते ९ टन कोळसाच्या अवैध ढिगारा पडलेला आहे. अश्या माहितीने रविकांत कंडे हे आपल्या कर्मचा-या सह घटनास्थळी पोहचले असता तिथे पोलीस निरीक्ष क विलास काळे व पोलीस स्टाॅप हजर होते.त्यानी सांगितले कि सदर कोळसा हा आरोपी विक्रम तिवाडे , शैलेश आसोले, आकाश भगत यांनी चोरून येथे जमा केला आहे. सदर कोळसा जप्त करून ट्रक मध्ये भरून वेकोलि इंदर खुली खदानच्या काटयावर वजन केले असता कोळसा ४८०० किलो वजन भरल्याने त्याची किंमत १९२०० रुपयाचा कोळसा जप्त केला.
या प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी विक्रम तिवाडे, शैलेश आसोले, आकाश भगत यांच्या विरुद्ध कलम ३७९ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.