संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दैनिक देशोन्नतीने 17 ऑक्टोबर 2024 च्या अंकात ‘बोगस एन ए व नकाशावर प्लॉट विक्री जोमात’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते या वृत्त संदर्भात आज कामठी तहसील कार्यालयाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात एका शेतकऱ्याची बनावट शेतीविक्री चा करारनामा करून शेतकऱ्यांची 46 लक्ष 63 हजार रुपयाने फसवणूक केल्याचा प्रकार आज उघडकीस आला असून यामध्ये कामठी तालुक्यातील लिहिगाव रहिवासी रवींद्र गेचुंडे व दिपक गेचुंडे नामक शेतकऱ्यांशी बनावट विक्री करारनामा करून तीच शेती इतर दुसऱ्याला विकून रजिस्ट्री करून 46 लक्ष 63 हजार रूपयाची फसवणूक केली असून फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव रतीराम शंकर मोटघरे रा अंबाडी तहसील कुही जिल्हा नागपूर असे आहे.तर या फसवणूक प्रकारामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे.
प्राप्त माहिती नुसार फसवणूक करणाऱ्या रालतीराम शंकर मोटघरे नामक इसमाने लिहिगाव रहिवासी रवींद्र गेचुंडे नामक शेतकऱ्यांशी कामठी तालुक्यातील रांनमांगली येथील शेत सर्व्हे क्र 77,प.ह.क्र.27 आराजी 1.14 हे आर शेती 22 मे 2024 ला शेती विकण्याचा 11हजार रुपये बयाना घेऊन सौदा केला व 30 मे रोजी विक्रीचा करारनामा करून 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत वेळोवेळी टप्प्या टप्प्याने रकम घेत असे एकूण 46 लक्ष 63 हजार रुपये घेऊन विक्रीचा करारनामा केला.यासंदर्भात दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक विक्रेता दस्त नोंदणी लेखक कडे गेले असता लक्षात आले की ही शेती 20 सप्टेंबर 2024 ला कुही तालुक्यातील सील्ली गावातील विनोद अंबादास सोनसरे नामक व्यक्तीला विक्री करून दिल्याचे लक्षात येताच एकच धक्का बसला.
सदर प्रकार जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्याकडे येताच लोकप्रतिनिधी म्हणून सदर शेतकऱ्याच्या फसवणूक झालेल्या परिस्थितीची गांभीर्याने जाणीव घेत कामठी येथील दुय्यम निबंधक कार्यालय गाठून प्रकरणाची माहिती घेतली असता विनोद सोनसरे यांना करून दिलेल्या नोंदणीक्रूत रजिस्ट्री मध्ये सात बारा वर नमूद असलेले कर्ज मुरलीधर अर्बन क्रेडिट को ऑपरेटीव्ह सोसायटी कुही यांचे 10 हजार रुपये चा बोजा असूनही रजिस्ट्रार विभागाने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता ना हरकत प्रमाणपत्र न जोडता बोगस कागदपत्रांच्या आधारावर दस्त नोंदणी झाल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांला कायदेशिर न्याय मिळावा यासाठी रजिस्ट्री कार्यालयाच्या चुकीच्या पद्धतीने लावलेली रजिस्ट्री रद्द करण्यात यावी व फसवणूक करणाऱ्या बोगस शेती विक्रेत्यांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी जी प सदस्य दिनेश ढोले यांनी केली आहे. तर यासंदर्भात रजिस्ट्रार विभागाने रजिस्ट्री रद्द करण्याचे अधिकार आम्हाला नसून वरिष्ठ पातळीवर योग्य ती शहनिशा करून विषय मार्गी लावण्यात येईल असे सूचित वक्तव्य केले.