रामटेक :- जगनाडे चौक लंबे हनुमान मंदिर जवळ चालकाचा बैलेन्स बिघडल्याने चार चाकी वाहनाचा अपघात. गाडीतील 3 जण जख्मी झाले असल्याची घटना सकाळी 10 ला घडली. .सुदैवाने गाडीतील कुटुंब बचावले. 3 जण जख्मी झाले. रामटेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
लंबे हनुमान मंदिर जवळ रामटेक येथे , दिनांक 17 नोव्हेंबर ला सकाळी 10 च्या दरम्यान एम.एच. 32 सि 7512 क्रमांकाची कार वर्धे वरून रामटेक मार्गाने तिरोडा येथे जा त असताना लंबे हनुमान मंदिर वळणावर कार समोर कुत्रा आल्याने , चालक धर्म खियानी यांचा तोल गेला ,स्विफ्ट गाडी अनियंत्रित झाल्याने पलटी मारली . कार मद्ये धर्म खीयानी यांचे सह त्यांची पत्नी , वहिनी , आणि 3 छोटी मुले होती. चालक धर्म खियाणी ह्यांना जखम झाली.
सुदैवाने लहान मुले , व दोन महिला बचावल्या. पलटी घेताच आजू बाजूच्या लोकांनी मदतीला धाव घेतली व उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे भरती केले.
चालक धर्म खियानी यांचेवर उपचार सुरू आहे. हया दिवसात ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात च्या घटना झाल्या असल्याने संबधित विभागाने या गंभीर बाबीवर लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
या मार्गाने नेहमीच घटना होत असतात . समाजसेवक सुरेश सज्जा यांनी जखमींना रुग्णालयात भरती करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.सहायक पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी आपल्या पोलिस मित्रांसोबत घटनास्थळी जाऊन चौकशी केली.पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्र्वर यांचे मार्गदर्शनात सुरू आहे