पोरवाल महाविद्यालयात “इतिहास अभ्यास मंडळ”च्या कार्यकारिणीचे गठन..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारा शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ करीता “इतिहास अभ्यास मंडळ”च्या कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख व कार्यकारिणीचे समन्वयक डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात प्रत्येक शैक्षणिक सत्रात कार्यकारिणी गठन करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच नवनवीन उपक्रमांद्वारे इतिहास विषयात आवड निर्माण करण्याचा उद्देश्य स्पष्ट केला. कार्यक्रमाचे उद्घाटक, वक्ता व प्रमुख पाहुणे डॉ.भूपेश चिकटे, माजी प्राचार्य शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली व माजी समाजविज्ञान अधिष्ठाता रा.तू. म. नागपुर, विद्यापीठ, नागपुर यांनी आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकतांना इतिहासाच्या वस्तुनिष्ठतेवर भर दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी इतिहास विषयाचे महत्व विषद करतांना नवीन उपक्रमांबाबत चर्चा केली. याप्रसंगी निर्वंत: लक्ष्मीबाई सावजी तागडे व निर्वंत: सावजी शंकर तागडे यांच्या स्मुर्ती प्रीत्यार्थ बी.ए. इतिहास विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल हिंदी माध्यमाची गुलअफ़शा नाज व मराठी माध्यमातून रितेश कम्भाले यांना विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिन्ह आणि रोख राशी पुरस्कार देवून त्यांना सम्मानित करण्यात आले. इतिहास अभ्यास मंडळाच्या नवगठित कार्यकारिणीच्या अध्यक्ष संध्या मस्के, उपाध्यक्ष शालिनी अनिल सरोज, सचिव विकास शेंडे, सहसचिव अतिकुर अनिसुर रहमान, कोषाध्यक्ष अलकमा ज़हरा हैदरी, हिशोब तपासनिस शिल्पा मस्के, हिशोब तपासनिस प्रिया कोडवते, सदस्य प्राजक्ता पारधी, कंचन चौहान, पूजा गणेश कांबळी, बादल घनश्याम पाटील, ख़ुशी गजभिये, सादिक रज़ा, उम्मे अफ़शा, वरिशा सुमैन यांचा सुद्धा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्याचे उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवती, उपप्राचार्य डॉ. रेणु तिवारी, प्रवीण अम्बादे सहित बहुसंख्यने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशीष थूल तर आभार डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Thu Oct 20 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.19) 09 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर, गांधीबाग आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights