‘शेतकऱ्यांनी ई-पीक पेरणी’ ॲप डाऊनलोड करावे  – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर :- शेतकऱ्यांना ई-पीक पेरणी ॲपमुळे विमा व इतर शेतीविषयक सर्व लाभ घेण्यास मदत होणार आहे. शासनाने हा ॲप शेतकऱ्यांसाठी प्रसारित केला असून आतापर्यंत जिल्ह्यात फक्त 30 टक्के शेतकऱ्यांनी हा ॲप डाऊनलोड केला आहे. अजूनही 70 टक्के शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला नाही. ॲप डाऊनलोड करण्याची मुदत 15 नोव्हेंबर असून शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पेरणी ॲप डाऊनलोड करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मदत करणार आहेत. शेतकऱ्यांनी या ॲपमध्ये आपल्या पिकांची छायाचित्र, पीकांची व इतर माहिती डाऊनलोड करावी. मोबाईल नसेल अशा गरिब शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांची मदत घ्या. येणाऱ्या काळात या ॲपला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे, शेतकऱ्यांनी जे पेरलं तेच येथे दिसणार आहे. ई-पीक पेरणीमुळे शेतकरी योजनेस वंचित राहू नये, अशी विनंती त्यांनी केली.

अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क साधावा.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com