महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा उपक्रम

– अभिरुप स्वरुपात राजवर्धन कारंडे यांनी सांभाळले कौशल्य विकास मंत्री पद

मुंबई :- युवकांना काळानुरूप कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी प्रथमच दिली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

अभिरुप स्वरूपात कौशल्य विकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेल्या राजवर्धन कारंडे यांनी कौशल्य विकास मंत्री लोढा यांचे आभार मानून नूतन मंत्रिमंडळाने कौशल्य विकास विभागाचे कामकाज जाणून घेतले.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील आपल्या कार्यालयात भेटीसाठी आमंत्रित केले होते. शासनाची कार्यप्रणाली समजावी आणि मंत्रालयाचा अनुभव मिळावा हा या भेटीमागे उद्देश होता. या भेटीत कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचा कार्यभार एका तासासाठी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिरुप स्वरूपात सोपवण्यात आला.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमंधून निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात आणि प्रतिनिधींचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते. या विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची माहिती, त्यांच्या कार्याची पद्धत समजते आणि लोकोपयोगी योजनांची माहिती होते. नुसते शॅडो मंत्रिमंडळ नव्हे तर या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मंत्रालयात येऊन कामकाजाचा, विभागांचा अगदी जवळून अनुभव घेता यावा यासाठी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालया च्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे मंत्रिमंडळ समृद्धी तुपे – मुख्यमंत्री, रिया खानोलकर – गृहमंत्री, पार्थ थोरवत, आर्यन दराडे – उपमुख्यमंत्री, पर्णवी धावरे – सभापती म्हणून उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले “आजचे विद्यार्थी आपले उद्याचे नेते असून, त्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रशासनाच्या संपर्कात येतील तेव्हा नक्कीच त्यांना हा आपला अनुभव आठवेल. हा एक छोटा अनुभव असला तरी, त्यांना त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करणारा ठरू शकतो. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना थोडे नवीन शिकायला मिळते आणि ते आपले विचार अधिक सुस्पष्ट आणि विस्तृत करू शकतात.

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केंद्र शासनाच्या योजना, कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षण, विभागाचे कामकाज याची सविस्तर माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भेंडाळा येथे दोन दिवसीय सांस्कृतिक मंडई उत्सवाची आजपासून सुरुवात 

Fri Feb 7 , 2025
अरोली :- तारसा – चाचेर जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भेंडाळा येथे उद्या दिनांक 7 जानेवारी शुक्रवारपासून सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम समिती तर्फे दोन दिवसीय सांस्कृतिक मंडळ उत्सवाची सुरुवात होणार आहे. शुक्रवारला सकाळी नऊ वाजता पासून जिल्हा चंद्रपूर तालुका नागभीड मुक्काम काम्पा कलापथक निळा निशान शाहीर सुरमा बारसागडे यांच्या संपूर्ण पार्टी सहित विरुद्ध जिल्हा ,तहसील वर्धा राहणार समुद्रपूर तुरा पार्टी शाहीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!