राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत विविध विभागांकडून आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रेल्वे विभागाच्या जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टयांचे पुनर्वसन करणे, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंगीकृत्त उपक्रम महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्यौगिकी मर्या. (महाप्रित) यांच्या विविध योजना, स्कॉलरशिप योजनेमध्ये ॲटोरिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे, अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिगंळे यांनी यावेळी सादरीकरण करून विविध योजनांची माहिती करून दिली.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे,मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) वंदना कोचुरे यांच्यासह गृह विभाग, नगरविकास विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, विधि व न्याय विभाग, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मध्य व पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'आई' नीति के अंतर्गत एमटीडीसी के पर्यटक आवासों में महिलाओं के लिए 50 प्रतिशत छूट - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Sat Dec 30 , 2023
मुंबई :- राज्य सरकार की 19 जून 2023 की ‘आई’ महिला केंद्रित/लिंग समावेशी पर्यटन नीति के अनुसार, महिला पर्यटकों और महिला उद्यमियों के लिए एमटीडीसी की विभिन्न योजनाएं लागू की जा रही हैं। पर्यटन मंत्री गिरीश महाजन ने जानकारी दी है कि इस नीति के अंतर्गत अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मद्देनजर 1 से 8 मार्च 2024 तक 8 दिनों के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!