डॉ. सी. डी. देशमुख, जैवविविधता प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पथदर्शी ठरेल – वनमंत्री गणेश नाईक

– जैवविविधता प्रकल्पासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा

मुंबई :- निसर्ग पर्यटन योजनेअंतर्गत रायगड येथे उभारण्यात येणारा डॉ. सी. डी. देशमुख, जैवविविधता प्रकल्प हा नाविन्यपूर्ण असून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पथदर्शी ठरणार आहे. यासाठी उर्वरित निधी वितरीत करण्याच्या प्रक्रीयेस गती देण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. रोहा येथील जैवविविधता प्रकल्पासाठी जुलैपुर्वी लागवड व्हावी व याचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.

सह्याद्री अतिथीगृह येथे निसर्ग पर्यटनस्थळांचा विकास योजनेअंतर्गत रोहा, जामगाव येथे ४४ हेक्टर क्षेत्रात डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता, वन व वनस्पती उद्यान उभारण्याच्या कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, वित्त विभागाचे अधिकारी कल्याणकुमार आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या प्रकल्पांतर्गत वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येईल. या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट विविध जीवसृष्टीचा समतोल राखणे आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणे हा आहे. जैवविविधता २०२४-२५ करिता राज्य योजनेअंतर्गत ६६८.४२ लक्षचा प्रस्ताव आहे. यापैकी १०.५४ कोटीचा निधी प्राप्त असून, उर्वरित १५६२ लक्ष निधी मंजूर केल्यास तातडीने जैवविविधता प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. पूर्व पावसाळी रोपवन कामे प्रगतीपथावर आहेत. जामगाव येथे ३७९ पार्ट येथे मुरूम रोड तयार करणे, तसेच अंतर्गत पाणीपुरवठा करण्याकरिता पाईप लाईन, टाकी, पंप हाऊस संदर्भातील कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जैवविविधता प्रकल्प पथदर्शी ठरणार असून, यासाठी उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी. देशात ज्या फुलांचे वृक्ष लावण्यात येतात, असे जास्तीत जास्त वृक्षे या जैवविविधता प्रकल्पात लावण्यात यावेत. याचबरोबर माणगाव नगरपंचायतीत येणाऱ्या आदिवासी नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छतागृहे, विद्युतवाहिनी, रस्ते, शाळा या कामांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाळू धोरणाची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Thu May 15 , 2025
मुंबई :- स्वस्त दराने रेती, वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने नवे सर्वंकष सुधारीत वाळू धोरण लागू केले आहे. राज्यात या धोरणाची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जलदगतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. वाळू निर्मिती धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता मंत्रालय येथे आढावा बैठक झाली. वित्त व नियोजन, मदत पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!