अंत्योदय कार्ड धारकांना साखर वाटप करा तहसीलदारांना नागरी सुविधा समितिचे निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शासनाकडून अंत्योदय राशन कार्ड धारकांना प्रति कार्ड 1 किलो साखर प्रत्येक महिन्याला देण्याचे निर्देश आहे परंतू रास्त भाव स्वस्त धान्य दुकानदार अंत्योदय कार्ड धारकांना साखर आली नसल्याचे सांगून उलट पावली परत पाठवत आहेत याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागरी सुविधा समितिच्या वतीने तहसीलदार अक्षय पोयाम यांना आज शुक्रवारी दुपारी निवेदन देऊन दोषी रास्त भाव स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाहीची मागणी केली

तहसीलदार अक्षय पोयाम यांनी पुरवठा निरीक्षक अर्चना निमजे यांना बोलावून याबाबत आवश्यक निर्देश दिले. निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात विक्की बोंबले, राजेश खंडेलवाल, जितेंद्र खोब्रागडे, दिनेश खेडकर यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलिचा १८० किलो कोळसा दुचाकीने चोरून नेताना पकडले

Fri Jan 20 , 2023
वेकोलि सुरक्षा अधिकारी ची कारवाई १६४४० रूपयांच्या मुद्देमाल जप्त .  कन्हान :- पोलिस स्टेशन अंर्तगत वेकोलि कामठी उपक्षेत्र खुली कोळसा खदानचा दगडी कोळसा चोरी करून नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील नाका नं ७ येथे मोटरसायकल स्वार दुचाकीवर दोन बोरी अवैध कोळसा बांधुन नेत असताना कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी आरोपीस पकडुन १८० किलो किंमत १४४० रूपये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights