नागपूर :- नागपूरचे सुपूत्र आणि महाराष्ट्राची शान देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आज गुरुवारी (ता.५) शहरातील लक्ष्मीनगर चौकामध्ये जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता सर्व नागरिकांनी या गौरवशाली क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी लक्ष्मीनगर चौकात एकत्र यावे, असे आवाहन माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी नागपूरकरांना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीनगर चौकात मोठ्या स्क्रीनवर शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यानंतर आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात मिठाई वाटून या गौरवशाली क्षणाचा आनंद साजरा केला जाईल. नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्व जनतेने मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.