देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस सतर्क

चंद्रपूर :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि मुनगंटीवार यांना उघडपणे सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन धमकी देण्यात आली आहे. संबंधित धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याकडून धमकी देण्यात आली आहे. या दाम्पत्याकडून व्हिडीओत शिवीगाळ देखील करण्यात आलीय. तसेच फडणवीस आणि मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राजुरा येथील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी संबंधित व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

भाजप कार्यकर्त्यांनी या दाम्पत्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्यावर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी संदर्भात गुन्हा दाखल केलाय. गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

NewsToday24x7

Next Post

धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालय फोडले

Tue Nov 21 , 2023
जालना :- धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा आणि समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. राज्यातील अनेक भागात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन सुरू आहे. जालन्यातही धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता. यावेळी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं आहे. मोर्चेकऱ्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफो केली असून वाहनांच्या काचाही फोडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com