नागपूर :- नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि एक्वा मार्गावर मेट्रो प्रवाशांची संख्ये मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांची मेट्रो सेवेला पहली पसंती मिळत आहे. खापरी आणि लोकमान्य नगर मार्गिकेवर नियमित पणे यामध्ये वाढ होत आहे. काल दिनांक १४ नोव्हेंबर (बालक दिनाच्या निमित्याने) रोजी ८२,५५८ प्रवाश्यानी मेट्रोने प्रवास केला. उल्लेखनीय आहे कि, यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची मेट्रोला पसंती मिळाली आहे.
या पूर्वीच्या वाढीव प्रवासी संख्या पुढील प्रमाणे :
• दिनांक २३ सप्टेंबर २०२२ : टी-२० सामन्यादरम्यान मध्यरात्री नंतर ३ वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे सेवा देण्यात आली होती. या दिवशी ८०,७९४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
• १५ ऑगस्ट २०२२ रोजी मेट्रो प्रवाशांची संख्या ९०,७५८
• ५ ऑक्टोबर २०२२रोजी, दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी ८८,८७६ प्रवाशांनी यात्रा केली
• १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ८२,५५८ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला.
मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून पिपळाफाटा, बेसा, म्हाळगीनगर, नरेंद्रनगर ते छत्रपतीनगर मेट्रो स्टेशनपर्यंत फीडर बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे हिंगणा ते लोकमान्यनगरपर्यंत फीडर बस सेवा उपलब्ध झाल्यामुळे हिंगणा आणि आसपासच्या शहरातील रहिवाशांना फायदा होत आहे. याचा लाभ मेट्रो रेल्वे सेवेला मिळत आहे. खापरी मेट्रो स्टेशनपासून एम्स आणि मिहानपर्यंत फीडर सेवेच्या उपलब्धतेमुळे नोकरदार वर्ग मेट्रोचा अधिकाधिक वापर करत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मेट्रोवर सायकल, ई-रिक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिकवणीला जाणारे विद्यार्थी मेट्रो ट्रेनमध्ये सायकलने प्रवास करण्याच्या सुविधेचा फायदा घेत आहेत. वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी आणि सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी नागरिकांचा कल मेट्रो रेल्वेकडे दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक दर्जाच्या, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाच्या सुविधांसह मेट्रो रेल्वे ही नागरिकांची पहिली पसंती ठरत आहे.