विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून एकंदरच महाआघाडीतून राज्याच्या कानाकोपऱ्यात बातमी अशी पसरविण्यात आली आहे जी पूर्णतः अफवा आहे कि विधान सभा निकालानंतर शरद पवार हे एकाचवेळी एकाच बाणातून अनेक पक्षांची काही मान्यवर नेत्यांची मोठी शिकार करणार आहेत, विधान सभा निकालानंतर शरद पवार आणि काँग्रेस यांच्या सोबतीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाआघाडीचे सरकार स्थापण्यासाठी एकत्र येणार आहेत, ते त्याचवेळी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांनाही बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत त्यांना पवार पुढली अनेक वर्षे राजकारणातून नेतृत्वातून हद्दपार करणार आहेत, मी ज्या ज्या जिल्ह्यातून पायपीट करतो आहे त्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या खुबीने पसरविल्या गेलेली हि अफवा कानावर पडते, अफवा ऐकल्यानंतर पवारांनी आयुष्याच्या संध्याकाळी देखील आपला नेहमीचा स्वभाव व वृत्ती सोडली नाही ज्यामुळे ते कधीही पंतप्रधान किंवा देशमान्य नेते होऊ शकले नाहीत त्यावर वाईट वाटते आणि रागही येतो. आता नेमके सत्य सांगतो ज्यावर काही दिवसांपूर्वी स्वतः एकनाथ शिंदे देखील मोठे अस्वस्थ झाले होते मग त्यांनी मनातले थेट फडणवीस मोदी शाह या तिघांनाही शपथेवर सांगून टाकले. ते जे म्हणाले ते असे कि शिंदे यांना स्वतःचा आणि त्यांनी उभा केलेल्या शिवसेनेचा उद्धव ठाकरे पद्धतीने पवारांना बिलगून म्हणजे साक्षात मगरीच्या ओठांचे जणू चुंबन घेऊन काहीही झाले तरी अजिबात खात्मा करून घ्यायचा नाही, दुर्दैवाने जरी त्यांना त्यांच्या पक्षाला सत्तेबाहेर राहण्याचा प्रसंग ओढवला तरीही त्यांना यापुढे महायुतीतून बाहेर पडायचे नाही, ज्या मोदी शाह आणि फडणवीस यांनी त्यांच्यावर सख्य्या भावागत प्रेम केले ते संबंध दुरावतील संपतील खतम होतील असा कुठलाही धोका त्यांना द्यायचा नाही आणि पत्करायचा नाही, पवार पद्धतिने बिनभरवश्याचा धोकादायक नेता अशी त्यांना स्वतःची इमेजउभी कराची नाही घडवायची नाही, थोडक्यात महायुती अभेद्य आहे म्हणूनच पवार अस्वस्थ होत यापद्धतीच्या अफवांना पाणी घालताहेत….
दुसरा मुद्दा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांचे बलाढ्य नेतृत्व संपविण्याचा त्यात फक्त एका मुद्द्यावर सत्यता आहे कि पवारांनी मोठ्या खुबीने उद्धव यांना आधी जवळ घेतले त्यांना महत्व दिले सत्ता दिली मुख्यमंत्री केले प्रत्येक ठिकाणी मान देत पुढे पुढे केले आणि सत्तेच्या मार्गातल्या या एकेकाळच्या बलाढ्य विरोधकाला त्याच्या पक्षासहित संपविणार काय, आजच संपवून टाकले आहे, उद्धव सेनेची उमेदवार यादी मोठ्या खुबीने एवढी वीक क्षीण निवडून न येणारी बनविण्यात आली कि तशीही उद्धव सेनेची पवारांच्या महाआघाडीला यापुढे गरज राहणार नाही. एक नक्की कि हेच पवार अगदी शंभर टक्के त्या एकनाथ शिंदेंना आपल्याकडे वळविण्यात मोठ्या प्रयत्नात होते पण दूरदर्शी एकनाथ शिंदेंनी पवारांचा प्रस्ताव अक्षरश: धुडकावून लावला. राज ठाकरेंच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ते आजही इतक्या वर्षांनंतर, काही मुले कशी चार दोन दिवसात पोहणे शिकतात आणि एखादे मूल वर्षभरानंतर देखील पाण्यात फेकले कि गटांगळ्या खाते त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते घाबरेघुबरे होते नेमके तेच आजही राज यांच्या नेतृत्वाबाबत दुर्दैवाने घडते आहे त्यामुळे पवार त्यांना संपविण्याकडे शक्ती खर्च करतील वेळ घालवतील असे शंभर टक्के होणार घडणार नाही. भारतीय जनता पक्षाला तेही पवारांनी राज्यातून संपविण्याची भाषा करणे किंवा मनोगत रचणे म्हणजे गोलीगतने उंटाच्या ढुंगणाला खाजविण्यासाठी हात वर नेण्यासारखे किंवा धर्मेंद्र पासून यादिवसात एखाद्या जक्खड म्हाताऱ्या अभिनेत्रीला दिवस जाण्यासारखे, ज्या पद्धतीचा आदर सहानुभूती प्रेम विश्वास सदभावना अभिमान कौतुक राज्यातला मग तो भाजपा विरोधक असेल किंवा मित्र परिवारातला, कुठल्याही जातीचा धर्माचा आणि कोणत्याही विचारांचा असेल असा एकही कोपरा नाही जेथे हे शब्द फडणवीसांना लोकांकडून लाभत नाहीत लाभलेले नाहीत, भाजपाला संपविणे दूर दूर पर्यंत पवारांना शक्य नाही पण देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व संपविणे केवळ एक दिवास्वप्न एवढेच काय फडणवीसांचे उत्तम नेता म्हणून महत्व कमी करणे देखील शरद पवारांना अजिबातच शक्य नाही, शक्य झाले नाही, त्यांनी एकप्रकारे एकाचवेळी अनेक विषप्रयोग त्या कंस कान्हपद्धतीने या आधुनिक बलाढ्य अशा कृष्णावर केले पण पवारांचा प्रत्येक बाण फडणवीसांनी कसा हवेतल्या हवेत जिरवला ते मला प्रत्येक प्रसंगात अगदी जवळून माहित आहे म्हणून तुम्हाला आठवत असेल कि मी नेहमी फडणवीसांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची चिंता लिखाणातून बोलण्यातून व्यक्त करतो कारण एक केवळ चपळ हरीण सत्तेच्या रक्ताला चटावलेल्या वाघासमोर झुंझ देत असते आणि जिंकून तावून सुलाखून बाहेर पडते…
तूर्त एवढेच : हेमंत सुशीला श्रीराम जोशी