मनपाच्या नदी व नाले सफाई अभियानाला सुरूवात

दोन टप्प्यांत होणार स्वच्छता : विविध संस्थांचे मनपाला सहकार्य

नागपूर :  नागपूर शहरातून वाहणा-या नाग, पिवळी आणि पोहरा या नद्यांसह नाल्यांच्या सफाई अभियानाचा मंगळवारी (ता.१२) शुभारंभ झाला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बेलतरोडी रोडवरील पोहरा नदीवर पारंपरिक पद्धतीने जे.सी.बी.ची पूजा करून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच त्यांनी सेंट झेव्हियर शाळा जवळ पूर्व नागपूर येथे नाग नदीवर सुरू असलेले सफाई अभियान कामाची पाहणी केली आणि संबंधितांना आवश्यक निर्देश दिले.

          यावेळी मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, किरण बगडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, उपअभियंता राजेश दुफारे, नदी व सरोवरे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल आदी उपस्थित होते.

     दरवर्षी मनपातर्फे उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यावर्षी नदी स्वच्छता अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात अभियान सहा उपभागामध्ये राबविण्यात येणार असून दुसरा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ०.८ – १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येते.
यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. पिवळी नदीची लांबी १७ किमी, नाग नदीची लांबी १७.७५ किमी आणि पोहरा नदीची लांबी १२ किमी आहे. नदी स्वच्छता अभियान प्रत्येक वर्षी लोक सहभागातून राबविण्यात येते. अभियानात गैर शासकीय संस्थांचे सुद्धा सहकार्य मिळते. यावर्षी सुद्धा नागपूर सुधार प्रन्यास तसेच मनपातील कंत्राटदार यांचेकडून प्राप्त होणा-या पोकलेन व टिप्पर व्दारे करण्याचे नियोजीत आहे. नदया व्यतिरिक्त हत्तीनाला गड्डीगोदाम,  बाळाभाऊपेठ,  बोरीयापूर, डोबीनगर, लाकडीपूल, तकीया, नरेंद्रनगर, बुरड नाला आदी मोठे आणि इतर छोटे असे एकूण २३२ नाले शहरात आहेत. यापैकी नदी व मोठ्या नाल्यांची स्वच्छता ही मशीनद्वारे केली जाते. तर छोट्या नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येते. नाले सफाई मोहिम देखील सुरू करण्यात आली आहे. शहरातील तिनही नद्यांसह सर्व नाल्यांची योग्य व व्यवस्थित स्वच्छता व्हावी याकडे प्राधान्याने लक्ष देउन विहित कालावधीमध्ये नदी व नाले स्वच्छता अभियान पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

          नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेणे, नदीमधून काढण्यात येणा-या मातीचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी करणे, नदी व नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होउ नये याची काळजी घेणे या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देउन कार्यवाही करण्याचेही निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

असे होणार नदी स्चछता कार्य

नाग नदी
१. अंबाझरी तलाव ते पंचशील चौक
२. पंचशील चौक ते अशोक चौक
३. अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल
४. सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाण पूल (भंडारा रोड)
५. पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)

पिवळी नदी

१. गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट
२. मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पूल
३. कामठी रोड पूल ते जुना कामठी रोड पूल
४. जुना कामठी रोड पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)

पोहरा नदी

१. सहकार नगर ते नरेंद्र नगर पूल
२. नरेंद्र नगर ते पिपळा फाटा
३. पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगाव

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

टेकाडी येथे पी डब्लु एस काॅलेज द्वारे सात दिवसीय शिबीर थाटात संपन्न

Wed Apr 13 , 2022
पुन्हा शिबीर पुढल्या वर्षी सुद्धा टेकाडी गावात घेऊन या – सरपंच सुनिता मेश्राम   कन्हान : – टेकाडी येथे पी डब्लु एस काॅलेज नागपुर द्वारे शिबीरांचे आयोजन करण्यात आले असुन काॅलेज च्या विद्यार्थी, विद्यार्थींनी व शिक्षकांनी नागरिकांना विविध जिवनावश्यक विषयी माहिती देऊन विविध कार्यक्रमाने शिबीर थाटात संपन्न करण्यात आले.         सात दिवस टेकाडी येथे पी.डब्ल्यु.एस कॉलेज चे प्राचार्य डॉ.पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com