अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ प्रेम बंधन लान तिरोडा येथे आमदार सहेराम कोराटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शहारातील अनेक समस्या बदल माहीत देण्यात आली.शासनाच्या महागाई धोरण , ईडी , घर घर तिरंगा योजना वर टिका सुध्दा करण्यात आली. कार्यक्रमाला अभिजित वंजारी ,आमदार, सहेराम कोराटे,माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड ,तालुका अध्यक्ष राधेलाल पटले सह शहर अध्यक्ष ठामेंन्द चव्हाण सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.