बोधिमग्गो महाविहारातील धम्म संथागार म़ध्ये इण्डो-थाई बौद्ध मैत्री संघाचा अभिनंदनीय सोहळा..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी :- “बुद्ध भूमी भारताने दिलेला बुद्धाचा विचार विश्वात जगाला आदर्श जीवनाची प्रेरणा देतोय म्हणून ऋणानूबंधाची जाणिव असल्यामुळे जगातिल बौद्ध राष्ट भारतात दान देवून पुण्य संपादन करतात. विश्वामध्ये मैत्री व करूणा स्थापित करण्यात व भारतात बौद्ध धम्म पुर्णस्थापित करण्यात भारत-थायलंड बौद्ध मैत्री संघाची योजना आहे, असेल मत थायलंड वरुन आलेल्या दायकांनी व्यक्त केले.”

शनिवार, दिनांक 23 मार्च 2023 ला बोधिमग्गो महाविहार, भीमनगर-ईसासनी, हिंगना रोड येथील धम्म संस्थागारात थाईलैंड वरून आलेल्या पाहुण्यांचे अभिवादनिय अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात भदंत नाग दिपांकर महास्थविर यांनी त्रि-शरण पंचशील प्रदान केले. संचालन डाॅ. भदंत सीलवंस महास्थविर यांनी केले. प्रमुख अतिथी मा. डाॅ प्रसित बूत्सिरि, अध्यक्ष विश्व शांती मास मिडिया परिषद तथा भारता मध्ये बौद्ध धम्म पुर्णस्थापन योजना, थायलंड, मा. डाॅ सुलेमास सुत्थिसम्फात, अध्यक्ष- बुद्धिष्ट असोसिएशन ऑफ थायलंड, मा. डाॅ विसित चाईसुवान, अध्यक्ष- बौद्ध शिक्षा

या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते, तसेच थायलंड येथील दायकांनी स्थानीय उपासक- उपासिकांना भेंट वस्तु प्रदान केले. त्यासोबतच स्थानीय उपासकांनी हर्षोल्हासित स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

बोधिमग्गो सेवा संस्था च्या माध्यमातून मागील तीन दशकापासून अनेक लोकोपयोगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता भदन्त धम्मिको, जीवनदर्शि, श्रामनेर सारिपुत्त, मोग्गल्लान व बोधिमग्गो संडे स्कूल चे विद्यार्थि, बोधिमग्गो कम्युनिटी किचन, बौद्ध तरूण – तरुणी आणि परिसरातील उपासक – उपासिकांनी परिश्रम घेतले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com