मान्सूनपूर्व तयारीची कामे लवकरात लवकर पूर्ण करा – अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांचे निर्देश 

नागपूर :- पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील सर्व भागात मान्सूनपूर्व कामे सुरु करावी व ती लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी दिले.

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी बुधवारी (ता.१४) आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त (उद्यान) गणेश राठोड, शिक्षणाधिकारी साधना सयाम, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कनिष्ठ अभियंता भस्मे, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, शाळा निरीक्षक प्रशांत टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणारी झाडे, विद्युत खांब तसेच तारांवर लोंबकळणाऱ्या फांद्या यामुळे मोठा धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे अशी सर्व झाडे लक्षात घेउन त्यांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी. विद्युत विभागाने देखील प्रकाश व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. याशिवाय मनपाद्वारे समाज विकास विभागाच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी निवारा केंद्र तयार करण्यात आलेली आहे. या सर्व केंद्रांमध्ये देखील व्यवस्था सज्ज करण्यात यावी. पावसाळ्यात रस्त्यावर राहणारे बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना निवारा गृहामध्ये आसरा देण्यात यावा. शहरातील पूरस्थिती उद्भवल्यास संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने आपात्कालीन स्थितीत नागरिकांच्या सुविधेसाठी मनपाच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्‍यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मनपाच्या शाळा देखील सज्ज ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी दिले आहेत.

सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करुन मान्सूनपूर्वी सर्व व्यवस्थेसंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्याची सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आयुक्तांनी साधला गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद

Thu May 15 , 2025
– महापालिका शाळांतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा महापालिका मुख्यालयात सत्कार नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये महापालिका शाळांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज बुधवारी केला. यावेळी आयुक्तांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला व पुढील आयुष्यातील विविध टप्प्यावर येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हा, अशा शब्दात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!