नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर शहरात आगमन गुरुवार 12 डिसेंबर ऐवजी शुक्रवार 13 डिसेंबर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोजी दुपारी 1 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. अशी माहिती भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरचे अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिली आहे.