छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले

– सर्व विभागाचे 688 प्रकरणे निकाली

कोंढाळी :- 14 मे 2025 रोजी काटोल तालुक्याचे कोंढाळी व मासोद राजस्व मंडळा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील नागरीकांना समस्या सोडविण्यासाठी येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अत्यंत यशस्वीरित्या पार पडले. या विशेष शिबिराचे आयोजन जनतेच्या विविध गरजा, अडचणी व समस्या शासनाच्या विविध विभागांमार्फत एकाच ठिकाणी सोडविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

या शिबिराला काटोल तालुक्याचे नायब तहसीलदार संजय भुजाडे यांचे उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करून नागरिकांशी संवाद साधला व शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

काटोल उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे तसेच काटोल चे तहसीलदार राजू रणवीर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण २५ विभागांच्या सहभागाने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये मुख्यतः कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय, रोजगार, महसूल, अन्न व नागरी पुरवठा,ही गोष्ट पाणीपुरवठा, पशुधन आरोग्य सेवा,वन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,ग्रामीण विकास अशा विषयांचा समावेश होता. या उपक्रमांमधून नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती देण्यात आली, अर्ज स्वीकृती, तक्रार निवारण, मोफत आरोग्य तपासणी, कृषी मार्गदर्शन, महिला बचतगट नोंदणी अशा अनेक सेवा पुरविण्यात आल्या.

या प्रसंगी लाखोटीया भुतडा हायस्कूल चे जिल्ह्यातील (ग्रा) अव्वल स्थान प्राप्त करणारी श्रावणी संजय सोमनकर हिला 99.60%गुनांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा उपस्थितांसमक्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मानव विकास विभागांतर्गत शाळेकरी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या सोबतच राजस्व विभागा मार्फत जीवंत सात बारा, फेरफार नोंदी, नागरी पुरवठा विभागा मार्फत राशन कार्ड वितरण करण्यात आले, सोबतच. या शिबिराला सर्व विभागाकडून 688समस्यांचे निराकरण करण्यात आले.

शिबिराला कोंढाळी/मासोद राजस्व मंडळातील शेतकरी, नागरी पुरवठा व अन्य विभागातील समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. लोकांचे शासकीय यंत्रणेवरचे विश्वास पुनर्स्थापित करणारे व जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लावणारे असे हे शिबिर ठरले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये: नायब तहसीलदार संजय भुजाडे, काटोल पंचायत समिती चे सह बी डी ओ रामदास गुंजकर, नागरी पुरवठा अधिकारी मोनिका गजबे,कृषी अधिकारी – बालविकास अधिकारी सतीश तट्टे, निळकंठराव लोहकरे, मंडळ अधिकारी सुरज साददकर मासोद राजस्व मंडळ अधिकारी कुणाल पिंजुरकर सह तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती लाभली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

व्यापंम पेक्षाही मोठा घोटाळा: राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा

Wed May 14 , 2025
– माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकारपरिषदेत मागणी नागपूर :- मागच्या काही दिवसांपासून बोगस शिक्षक भरती प्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहे. हजारो शिक्षकांना बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शाळांमध्ये नियुक्त्या देण्यात आले. यात मोठ्या प्रमाणावर संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. बोगस भरती प्रकरणी नागपुरातील काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती आहे. मध्य प्रदेशातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!