– गुन्हेशाखा सोनसाखळी विरोधी पथकाची कामगीरी
नागपूर :- फिर्यादी कुंदनसिंग रामसिंग हतवार वय ६९ वर्ष रा. प्लॉट नं. २. पांदन रोड, शक्तीमाता नगर, नंदनवन, नागपूर हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत खरबी चौक, तलमले सभागृह समोर, रोडवर एका दुकाना समोर बसले असता, मोपेड वरील दोन ईसांनी येवुन फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन पेंडन्टसहीत जबरीने हिसकावून मोपेडवरून पळून गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नंदनवन येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०४(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा सोनसाखळी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून आरोपी नामे १) मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद, वय २४ वर्षे, रा. वासिन प्लॉट, मोठा ताजबाग, सक्करदरा, नागपूर २) शेख नवाज शेख रियाज अहमद वय २० वर्ष रा. मोठा ताजबाग, नागपूर यांना चामट चक्की चौक येथून ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी वर नमूद जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपोंचे ताब्यातुन ०२ मोबाईल फोन, डियो मोपेड क. एम.एच ३१ एफ.डी ४४४८, एक सोन्याचे पेंडन्ट असा एकुण किंमती अंदाजे १,१०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईकामी नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, नविनचंद्र रेड्डी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि. मंगला हरडे, पोहवा. प्रफुल मानकर, मनिष घुरडे, पोअं. कुणाल लांडगे, अनिकेत इंगळे तसेच सायबर सेलचे पोउपनि, विवेक झिंगरे व त्याचे सहकारी यांनी केली.