गडचिरोली :- जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी येथे १ सप्टेंबर रोजी रेशीम दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, आरटीओ कार्यालयाचे श्री मोडक, केंद्रीय रेशीम मंडळ भंडाराचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा रेशीम अधिकारी अजय वासनिक उपस्थित होते.
रेशीम दिन कार्यक्रमानिमित्त सन 2023-24 रेशीम शेतीतून लक्षात बनलेले शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. मेश्राम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रेशीम दिनाच्या शुभेच्छा दिल्या व वन विभागाचे नियमाने समन्वय साधून भरघोस कोश उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त पर संभाषण केले. मोडक यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. गेडाम यांनी शेतकऱ्यांना रेशीम अळीच्या अंडीपुंजाची सध्यपरिस्थिती व तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुती रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरी येथील क्षेत्र सहाय्यक लोणारे, मेश्राम, विठ्ठले वरिष्ठ सहाय्यक, बिडकर भाविका पाल इत्यादी उपस्थित होते.