नागपूर :- फिर्यादीचे वडील नामे फारूख शहा शेख मोहम्मद शहा वय ४३ वर्ष रा. स्लॉट नं. ८, पद्मानगर, नारी रोड, कपिलनगर, नागपूर हे त्यांचा लहान मुलगा नामे साचीर फारूख शहा वय २० वर्ष याचे स्प्लेंडर प्लस गाडी क. एम.एच ४९ ए.एन ७९९५ वर मागे बसुन प्रतापनगर येधुन घरी जात असता पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत भोले पेट्रोल पंप चौकात एक अज्ञात दुचाकी वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व धोकादायकरित्या चालवुन फिर्यादीचे भावाने गाडीला कट मारल्याने फिर्यादीने वडील खाली पडुन गंभीर जखमी झाले. जखमी यांना उपचाराकरीता सेनगुप्ता व तेथुन मेडीकल हॉस्पीटल, ट्रामा सेंटर येथे दाखल केले होते. दि. २२.०५.२०२५ चे १९.०० वा. चे सुमारास उपचारादरम्यान डॉक्टरांनी फिर्यादीचे वडीलांना तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी शादीक फारूख शहा, वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. ८. पद्मानगर, नारी रोड, कपिलनगर, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे पोउपनि, भवाळ यांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरूध्द कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं., मो.वा.का., सहकलम १३४, १७७, १८४ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.