नागपूर :- तहसिल पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, डोवीनगर, मोमीनपूरा, नागपूर येथे रेल्वे लाईन जवळील झाडा झुडपामध्ये गोवंशीय जनावरे यांना बांधून ठेवलेले आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नमुद ठिकाणी जावुन पंचासमक्ष रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी एकुण १० लहान मोठी गोवंशीय जनावरे यांना अत्यंत कुरपने व निर्दयतेने दाटीवाटीने कोंडून चारापाणी न देता कत्तलीकरीता बांधून ठेवलेले मिळुन आले. नमुद जनावरांचा मालका बाबत माहिती काढली असता जनावरे हे पाहिजे आरोपी क. १) असलम कुरैशी उर्फ डॉक्टर कुरैशी वय ५५ वर्ष, २) शादाब शेख वय २८ वर्ष, ३) तुफैल अंसारी सर्व रा. गार्डलाईन मोमीनपूरा, नागपूर यांची असल्याचे समजले. घटनास्थळावरून एकुण १० गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे १,८०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद गोवंशीय जनावरे यांना गौरक्षण येथे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी फिर्यादी पोअं. संजय तिवारी वय ३६ वर्ष पोलीस ठाणे तहसिल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे पोउपनि. शेख यांनी आरोपीविरूध्द कलम ५, ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६, सुधारणा कायदा १९९५, सहकलम ११ प्राणी कुरता अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.