संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- टेकाडी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर बॉयपास रोड च्या वळणाजवळ कन्हान कडुन शिवनी कडे जाणा-या अँक्टीव्हा दुचाकीला मनसर कडुन वर्धे ला जाणा-या ट्रव्हर्ल्स बस चालकाने आपले वाहन वेगा ने व निष्काळजीने चालवुन दुचाकीला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात अँक्टीव्हा चालक शेख आशिफ शेख वकिल याचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर मागे स्वार नरेंद्र नायक हा गंभीर जख्मी झाल्याने त्याचा उपचार सुरू आहे.
शनिवार (दि.७) जुन २०२५ ला शेख आशिफ शेख वकिल वय ४५ वर्ष राह. मच्छी पुल कामठी व मित्र नरेंद्र नायक वय ४५ वर्ष राह. विवेकानंद नगर कन्हान हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टीव्हा दुचाकी क्र. एमएच ४० बीटी ६१७४ ने ईद असल्याने दावत खाण्याकरिता कामठी, कन्हान वरून मध्यप्रदेश च्या शिवनी येथे जात असताना टेकाडी बॉयपास पुलाखालुन रांग साईट जात असताना बॉयपास रोडवर चढणा-या रस्त्या वरील आंनद इंगोले यांचे शेता सामोर मनसर कडुन वर्धा कडे जाणा-या मागुन येणा-या ट्रव्हर्ल्स बस क्र. बीआर ०६ पीजी ३५६७ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन अँक्टीव्हा दुचाकीला सामोरून जोरदार धडक मारल्याने दुचाकी चालक शेख आशिफ शेख वकिल यांचा घटनास्थळी मुत्यु झाला आणि मागे स्वार मित्र नरेंद्र नायक गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचुन महामार्ग टोल प्लाझा च्या रूग्णवाहिकेने कामठी उपजिल्हा रूग्णालयात दोघाना नेण्यात आले. मित्र नरेंद्र गंभीर जख्मी असल्याने शासकिय मेयो रूग्णालय नागपुर येथे नेऊन उपचारार्थ दाखल करून उपचार सुरू आहे. त्यांची ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.
कन्हान पोलीसानी फिर्यादी ऑटो चालक मो इकबाल मो इब्राहिम वय ३७ वर्ष राह. सैलब नगर कामठी यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे हेकॉ नरेश श्रावणकर हयानी ट्रव्हर्ल्स बस चालका विरूध्द कलम १०६, २८१ बी एनएस २०२३ व १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.