संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :-मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडविण्यासाठी नुकतेच कामठी मौदा विधानसभा कांग्रेस च्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली असून सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमात शुभेच्छा देताना माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर म्हणाले की सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे गरजेचे आहे .सर्व धर्मामध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्वाचे आहे आणि इफ्तार पार्टी कार्यक्रमातून वेगवेगळे समाजबांधव एकत्र आल्याने बंधू भावना वाढीस लागण्यास मदत होते ,विचारांची देवाणघेवाण होते आणि आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होते हे इथं विशेष!
याप्रसंगी कांग्रेस पदाधिकारी इरशाद शेख,अनुराग भोयर, राजेश बनसिंगे,कांग्रेस कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव,कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान,माजी सभापती नीरज लोणारे,इंद्रिस नागानी,माजी सरपंच किशोर धांडे,येरखेडा ग्रा प सदस्य सतीश दहाट,नरेंद्र शर्मा,धीरज यादव,आशिष मेश्राम,राजेश कांबळे,तुषार दावाणी,मनोज यादव,राजकुमार गेडाम,सुमेध रंगारी,आकाश भोकरे,मोबिन ,आदी उपस्थित होते.