जागतिक एड्स दिननिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन

– समानतेने जगण्याचा संदेश

गडचिरोली :- १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या वर्षीचे घोषवाक्य “मार्ग हक्काचा सन्मानाचा” या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महावि‌द्यालयाच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. तर डॉ नागदेवते यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी “मार्ग हक्काचा सन्मानाचा” या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे. डॉ. दुर्वे, डॉ. साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, CSO डॉ. अभिषेक गव्हारे, जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय अधीसेविका, एआरटी, ICTC व विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांची उपस्थीती होती.

एडस् विरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय ते गांधी चौक, कारगिल चौक मार्गे परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे समाप्त करण्यात आली. रॅली मध्ये महावि‌द्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या वि‌द्यार्थिनीनी एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने पथनाटय सादर करण्यात आले व बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेषक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधीसेविका रामटेके यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जेव्हा न्यायमूर्ती भूषण गवई नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीजन महिलांच्या मुलांशी एकरुप होतात !

Mon Dec 2 , 2024
नागपूर :- क्षणिक रागाच्या भरात कायदा हाती घेऊन एखादा गुन्हा, वाईट कृत्य केल्यामुळे गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा व्हावी व केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना भविष्यातील संयमी जिवनासाठी आकार देता यावा यासाठी कारागृहांवर दुहेरी जबाबदारी असते. यात ज्यांची लहान मुले आहेत अशा महिला बंदीजनांच्या मुलांच्या वाट्याला अंगणवाडी सुविधेसह उमलण्याचे सारे हक्क मिळावेत यासाठी न्यायालय दक्ष असते. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सहा वर्षाखालील 7 मुले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com