संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती

– दहाही झोनमध्ये अभियानाला उदंड प्रतिसाद

नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचा शुभारंभ केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यांच्या नेतृत्तवात या चित्ररथाच्या माध्यमातून दहाही झोनमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

भारतीय संविधानाबाबत जागरुकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सवाची नागपूर शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे संविधान चित्ररथ तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून २७ जानेवारीपासून दररोज शहराच्या विविध भागात मनपा झोननिहाय जनजागृती केली जात आहे. याच श्रृंखलेत गुरुवारी (ता. ३०) सकाळी १० ते १२ दरम्यान सतरंजीपुरा व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लकडगंज झोन येथे हे अभियान राबविण्यात आले.

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे भारतीय संविधानावर आधारित आकर्षक चित्ररथ तयार करण्यात आले होते. त्याच चित्ररथाच्या माध्यमातून मनपातर्फे २७ जानेवारीपासून शहराच्या विविध भागात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. आतापर्यंत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरू नगर व गांधाबाग या झोनमध्ये जानजागृती अभियान रावण्यात आले आहे. ३० रोजी सतरंजीपुरा झोन अंतर्गत येत असलेल्या विट भट्टी, पारडी उड्डाण पूल, ऑटोमोटिव्ह चौक येथे सकाळी १० ते १२ दरम्यान चित्र रथ फिरवून जनजागृती करण्यात आली. तसेच सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान लकडगंज झोन अंतर्गत कच्छी विसा मैदानात जनजागृती अभियान राबवण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्राने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केली येत्या विधीमंडळ अधिवेशनात नियमावली सादर होईल - कामगार मंत्री ऍड आकाश फुंडकर

Fri Jan 31 , 2025
नवी दिल्ली :- महाराष्ट्र शासनाने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केलेली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली मांडण्यात येणार असल्याची, माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्र्याच्या बैठकीत दिली. येथील अशोका हॉटेलमध्ये काल आणि आज केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या कामगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी फुंडकर बोलत होते. या बैठकीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!