– मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- नागपूर शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारस्यासह कलेचा वारसा लाभला आहे. याच वारसाला नागपुरातील चित्रकारांनी जतन करण्याचे कार्य मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेच्या माध्यमातून केले आहे. आपल्या कल्पनाशक्तीतून शहरातील विविध इमारतींच्या कुंपण भिंतींना चित्रकारांनी अधिक सुशोभित करून दाखविले आहे. मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील इमारतीच्या भिंतींवर […]

नागपूर :- विदर्भ अर्बन बँकस को-ऑपरेटीव्ह असोसिएशन नागपूरच्या पंचवार्षिक निवडणुका अविरोध झाल्या व या असोसिएशनच्या पदाधिका-यांची सुध्दा अविरोध निवडणुक झाली यामध्ये खालील पदाधिकारी निवडुण आले. अध्यक्ष रविंद्र दुरुगकर, उपाध्यक्ष सतिश गुप्ता, सचिव  तुषारकांती डबले, सहसचिव सुभाष देवळकर वरील निवडणुक  सुनिल सिंगतकर जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्व निर्वाचित पदाधिकारी व संचलकांचे संजय भेंडे, अध्यक्ष नागपूर जागतीक बँक, कैलाशचंद्र, रामेश्वर फुंडकर […]

– अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी बडदास्त – 160 खोल्यांच्या गाळ्यांत सुविधा – अद्ययावत टेक्नॉलॉजीतून हीट पंप नागपूर :- अधिवेशनासाठी येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना चोवीस तास गरम पाणी मिळावे. त्यांचा वेळ वाचावा आणि संभाव्य धोका टळावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने गरम पाण्यासाठी हिट पंप बसविला आहे. दीड कोटी रुपयांचा खर्च करून ही कायमस्वरूपी सुविधा 160 खोल्यांच्या गाळ्यात करण्यात आली. शिवाय प्रत्येक क्वॉर्टरमध्ये फोमच्या गाद्या […]

-भदंत ससाई यांच्या नेतृत्वात निघाली मिरवणूक -बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवर्षाव नागपूर :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त इंदोरा बुध्द विहार समितीतर्फे इंदोरा येथून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या मिरवणुकीत इंदोरा, बुध्द विहाराचे सचिव अमित गडपायले यांच्यासह आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. तत्पूर्वी इंदोरा बुध्द […]

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार “भारतरत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण ‍दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी संविधान चौक स्थित बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी नागरिकांनी महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर न्यायशास्त्रज्ञ, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.6) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव […]

धर्मापुरी :- तेज गति से आ रही टाटा सूमो ने सामने से आ रहे दुपहिया वाहन में टक्कर मार दी। इसमें दुपहिया वाहन पर सवार एक युवती की इलाज के दौरान रास्ते में मौत हो गई, जबकि उसके माता-पिता गंभीर रूप से घायल हो गए जिन्हें इलाज के लिए भंडारा जिला अस्पताल में भर्ती कराया गया है. यह घटना अरोली […]

नागपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला बँकेचे अध्यक्ष प्रा गुलाबराव वानकर,आणि ज्येष्ठ संचालक अशोक कोल्हटकर यांनी,पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केले,या वेळी संचालक सर्वश्री मिलींद गाणार,नागेश बुरबुरे,अरविंद गजभिये,मुरलीधर मेश्राम,संगीता पाटणकर आदी संच्चालका सह मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर मोगरे,भावेश कांबळे,आश्विन गजभिये, सुरेश गाणार, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

नागपूर :- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासनाच्या विभागीय सहआयुक्त संघमित्रा ढोके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय सहआयुक्त प्रकाश राठोड यांच्यासह सचिन पांडे आदी उपस्थित होते.

मुंबई :- ‘कोविड – १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांच्या निवासव्यवस्थेचे संबंधित सर्व विभागांनी काटेकोर आणि अचूकपणे नियोजन करावे. कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळी अधिवेशनाच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्यादृष्टीने मोबाईल ॲप तयार करावे, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 27 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 90 उमेदवार तर 93 प्रभागातील 247 सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 7 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम कालावधीत थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षित जागेतून एकूण 119 उमेदवारांनी […]

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित केला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या या विशेषांकात विविध मान्यवरांनी आपल्या लेखांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक दत्ता भगत यांनी संविधान लेखकाचा उदय, डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ. आंबेडरकरांचा […]

जागतीक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान ३ लाभार्थ्यांना रु. ५० हजार कर्जाचे मंजुरी प्रमाणपत्र   १० लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड वाटप ३० यशस्वी उद्योजकांना सन्मानपत्र चंद्रपूर :- आज दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग मंत्रालय सुरु करण्यात आले आहे, शासनाच्या अनेक योजना आहेत ज्यातुन कर्ज घेऊन व्यवसायाची उभारणी करता येऊ शकते तेव्हा जीवनाला नवी दिशा देण्यास दिव्यांगांनी आत्मविश्वासाने नविन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन आयुक्त विपीन […]

नागपूर:- नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशनच्या माध्यमाने आज संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रामुख्याने असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खु महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, निवृत्त न्यायाधीश परशराम पाटील, नरेश मेश्राम, सिद्धार्थ फोपरे, शामराव हाडके, हिरालाल मेश्राम, एड अस्मिता तिडके, एड विलास राऊत, मोरेश्वर […]

काटोल :- काटोल विधानसभा क्षेत्रातील नरखेड तालुक्यातील अंबाडा(देशमुख) येथील ग्राम पंचायत निवडणुकीत प्रमिला बापूराव बारई सरपंचपासाठी अविरोध निवडून आल्या असून  विजय गुंजाळ, नारायण सरियाम, अनिल ठाकरे, सोनु रेवतकर, कविता फुले, इंदु कुमरे, मंजु उईके सदस्यपदी निवडून आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करत असलेल्या कार्याला प्रभावित होऊन  दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी भाजपा जिल्हा […]

– धर्मगुरू,एनजीओ व युनानी डॉक्टरांना दिली माहिती नागपूर :-  राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांचे प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात आहे. या अभियानाला अधिक गती मिळावी याकरिता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील बैठक कक्षात गोवर लसीकरणासंदर्भात जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील विविध अशासकीय सामाजिक संस्था, […]

सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – अतुल हजारे  भाजपा पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन.  कन्हान :- शहरात व ग्रामिण भागात दिवसे दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असुन शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यानी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करित निवेदन देत कन्हान परिसरात […]

नागपूर :- ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदने प्राप्त होत असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक महिन्यातील चौथ्या बुधवारला ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. चौथ्या बुधवारला सकाळी 11 ते 12 या वेळेत ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे. दिवस अगोदरच म्हणजे प्रत्येक महिन्यातील चौथ्या मंगळवारला ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज, निवेदन सहाय्यक अधीक्षक, गृह विभाग, जिल्हाधिकारी […]

नागपूर :- कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांपैकी आयकर पात्र सर्व निवृत्तीवेतन धारकांनी त्यांनी निवृत्तीवेतनाच्या उत्पन्नाच्या संदर्भात आवश्यक बचत केली असल्यास बचती विषयक माहिती विना विलंब कोषागारास बचत पत्राच्या झेरॉक्स प्रतीसह 9 डिसेंबरपर्यंत लेखी कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बचती विषयक माहिती प्राप्त न झाल्यास आयकर सूट मिळण्यासाठीची बचत केली नसल्याचे गृहीत धरून आयकर कपातीची कार्यवाही शासन नियमानुसार करण्यात येईल. याबाबत […]

नागपूर :-संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या परिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून अभिवादन केले. “बाबा आपका मिशन अधूरा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com