अमरावती :- महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या अधिसभागृहात आज (१५ ऑक्टोबर ) वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून ‘ मराठी विश्वकोश : स्वरूप आणि परंपरा ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी सलग 22 वर्षानंतर कांग्रेसच्या उमेदवाराची सभापतीपदी वर्णी कामठी :- सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षित असलेल्या कामठी पंचायत समितीच्या सभापतीपदी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे तर उपसभापतीपदी दिलीप वंजारी याची निवड करण्यात आली. तर या कामठी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत तब्बल 22 वर्षानंतर कांग्रेसच्या उमेदवाराची सभापती उपसभापतीपदी वर्णी लागून एकहाती सत्ता मिळाल्याची आनंदाची बाब असल्याचे मनोगत माजी […]
मुंबई :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केल्या जातो. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Mumbai :- Stating that service to the Divyang persons is service to God, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari sought the contribution of philanthropists and donors in society in making Divyang persons ‘Aatma Nirbhar’. The Governor was speaking after inaugurating the 15th Diwali Sneh Sammelan for Divyang persons at Malad in Mumbai on Saturday (15th Oct). The programme was organised by […]
मुंबई :- देशातील नेत्रहीन, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही, तर सहकार्याची गरज असते. दिव्यांगांना ईश्वर मानून त्यांची सेवा करणे हे पुण्यकार्य आहे. प्रत्येक काम राज्य किंवा केंद्र शासनावर सोडून चालणार नाही, तर दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, ‘सक्षम’ तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग […]
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका व मनपा शाळांमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यांनी पुष्पहार घालुन प्रतिमेस वंदन केले. चंद्रपूर शहर महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत मनपाच्या सर्व शाळांमध्ये आज भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाचा नव्वदावा वर्धापन दिन व डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनीष मुडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. एपीजे अब्दुल […]
नागपूर :- नक्षलवाद्यांना राष्ट्रविघातक कार्यात मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगित […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- प्रभाग 15 रमानगर येथे त्रेयलोक्य बौद्ध सहायक गण द्वारा संचालित अविष्कार बालवाड़ी केंद्रात आजादी चा अमृत महोत्सव अंतर्गत आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्या साठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक असल्याचे मत माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी यावेळी व्यक्त केले, सपना मडामे, […]
नागपूर :- तीन वर्षापूर्वी झालेल्या ‘मिनकॉन ‘ परिषदेतील विचार मंथनावर नवीन खनिकर्म धोरण तयार करण्याचे प्रलंबित होते. मात्र आता राज्यातील शासन बदलले असून 26 जानेवारीपूर्वी राज्याचे नवे खनिकर्म धोरण लागू करण्यात येईल,अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. राज्यातील खाण, खनिज आणि धातूंची उपलब्धता आणि उपयोगिता यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘मिनकॉन 2022 ‘ या तीन दिवसीय परिषदेचे नागपूरमध्ये […]
दिवाळी साहित्य विक्रीतून मिळणार भिक्षेकऱयांना रोजगाराच्या संधी नागपूर :- केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकरी ना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ह्युमॅनिटी सोशल फ़ाऊंडेशन व सह्याद्री फ़ाऊंडेशन ने पुढाकार घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने लागणारे गृह सजावट साहित्य जसे आकाशदीवे, पणत्या, लाईट सिरिज आदि वस्तु तयार करण्याचे स्किल ट्रेनिंग ह्युमॅनिटी सोशल फ़ाऊंडेशन […]
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा अंतर्गत प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण राज्यस्तरीय सादरीकरणासाठी तीन नवसंकल्पनांची निवड डॉ. दिलीप गोरे यांची नवसंकल्पना ठरली सर्वोत्कृष्ट नागपूर :- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेला नागपूर जिल्ह्यात विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी आपल्या नवसंकल्पनांची प्रभावी मांडणी करून राज्यस्तरावरही यश संपादन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी […]
नागपूर :- भाग आदिवासी असो,दुर्गम असो, कितीही असुविधा असो, व्यसनाधीनता असू द्या, जगातल्या कोणत्याही समस्येवर समाधान शोधण्याचे कसब शिक्षकांकडे असते. त्यामुळे शिक्षकांचे मुख्यालयी रहाणे, विद्यार्थी आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आश्रम शाळेत शिकलेल्या मात्र सध्या अमेरिकेत कार्यरत असलेल्या वैज्ञानिक डॉ.भास्कर हलामी यांनी आज येथे केले. शासनाच्या सोयी, सुविधा व योजनांचा लाभ घेऊन आपले […]
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दुकानातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने माधव किड्स वेअर यांच्याकडुन दंड वसुल केला. गुरुवार ता. १२ रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर पाहणी करतांना माधव किड्स वेअर येथील दुकानाच्या आतील कचरा दुकानासमोर रस्त्यावर ढकललेला आढळुन आला त्यामुळे माधव किड्स वेअर यांना नोटीस बजावण्यात आली होती. सदर दुकानमालक यांनी पालिका कार्यालयात येऊन दंड रकमेचा भरणा केला. महानगरपालिकेतर्फे […]
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.१७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजीत केली जाणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात […]
शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती… कोल्हापूर :- हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती […]
‘मिनकॉन ‘ २०२२ परिषदेचे थाटात उदघाटन नागपूर :- महाराष्ट्रामध्ये विदर्भा एवढे खनिज व खाणी कुठेच नाहीत. त्यामुळे राज्याचे नवीन खनिज धोरण ठरवताना विदर्भामध्ये खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची बांधणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस पार्क येथे आयोजित ‘मिनकॉन 2022’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख्य पाहुणे म्हणून दादाजी भुसे बोलत […]
मुंबई :- देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले. एम.ईस्ट वॉर्ड, गोवंडी (पूर्व) येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अबू आझमी, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवनार बेस्ट कामगार वसाहत […]
मुंबई :- मत्स्यबीज निर्मितीकरिता लागणारे साहित्य, प्रजनक साठा व मत्स्यबीजाकरिता खाद्य, संप्रेरके, तलाव व्यवस्थापनाकरिता लागणारे खत, रासायनिक द्रव्ये, जाळे, हापे, मजूरी, सामुग्री पुरवठा, लहान बांधकामे यासाठी आता जिल्हा वार्षिक योजनेमार्फत (डीपीडीसी) निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयामुळे शासकीय मत्स्यबीज केंद्र व संवर्धन केंद्र यामध्ये मत्स्यबीज निर्मिती कार्यक्रम […]
मुंबई :- वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस दि. 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आजपासून मंत्रालय प्रांगणात मराठी भाषा विभागातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सर ज.जी.उपयोजित […]