संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कामठी ग्रामसेवक ब्रह्मानंद खडसे यांनी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती मनोगतातून दिली. या निमित्त शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी समाजासाठी झटणाऱ्या सोनेगाव राजा गावातील महिलांच्या कार्य कौशल्याचा विचार करून, दोन महिलांची निवड केली. यात कांता पांडुरंग इसलवार व ममता राजु महल्ले या दोन महिला अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांना ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामसेवक खडसे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सरपंच मंदा शिंदें मेश्राम, उपसरपंच नीलकंठ भगत ,ग्रा प सदस्यगण,उपकेंद्र सोनेगाव चे डॉ दीक्षा मेश्राम,सुधाकर म्हस्के,ललिता घोडमारे,प्रतिभा महल्ले, अंगणवाडी सेविका आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.