भाजपाच्या 26 उमेदवारांचे अर्ज दाखल

– उमेदवारांसोबत मान्यवर नेत्यांचीही उपस्थिती

– महायुतीच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या एकूण 26 उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्याच्या पाहिल्याच दिवशी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत वाजतगाजत गुरुवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आदींचा समावेश आहे. यावेळी या उमेदवारांसोबत उपस्थित राहून भाजपा आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले.

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पराग अळवणी यांनी गुरुवारी विमानतळ कॉलनी येथील समाजकल्याण हॉल येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर, उत्तर प्रदेशचे आमदार डॉ. रतन पाल सिंह, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुभाष कांता सावंत उपस्थित होते. अंधेरी पश्चिम मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बांदेरी, शिवसेना विभाग प्रमुख अलताफ पेवेकर, संघटक पराग कदम, माजी नगरसेवक अनिश मकवाने, रोहन राठोड, सुधा सिंह आदि उपस्थित होते. मुलुंड मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुलुंड पूर्व येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुलुंड विधानसभेचे प्रभारी आणि उत्तर प्रदेशातील भाजप आमदार शलभ मणी त्रिपाठी, माजी खासदार मनोज कोटक, किरीट सोमैय्या, माजी आमदार प्रकाश मेहता, शिवसेना विभागप्रमुख जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते. कांदिवली पूर्व मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकूर कॉम्प्लेक्स येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.मलबार हिल मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोथरूड येथून चंद्रकांतदादा पाटील, मुंबईत वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर, शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल, नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित, धुळे मतदारसंघातून अनुप अगरवाल, शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा, धामणगाव रेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसड, हिंगणघाट मतदारसंघातून समीर कुणावार, गोंदिया मतदारसंघातून विनोद अग्रवाल, राळेगावमधून डॉ. अशोक उके, किनवटमधून भीमराव केराम, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, बदनापूर येथून नारायण कुचे, गंगापूर येथून प्रशांत बंब, शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, तुळजापूर येथून राणा जगजीतसिंह पाटील, सोलापूर दक्षिण येथून सुभाष देशमुख, कराड दक्षिण येथून अतुल भोसले, कोल्हापूर दक्षिण येथून अमल महाडिक आणि सुधीर दादा गाडगीळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शहादा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आली दिवाळी, घ्या रांगोळी म्हणत रांगोळी विक्रेत्यांची गंगा मौदा तालुक्यातील गल्लोगल्लीत

Thu Oct 24 , 2024
कोदामेंढी :- दिवाळीला अवघ्या पाच ते सहा दिवसांच्या कालावधी उरलेला असताना मौदा तालुक्यातील 63 ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या 126 गावातील नागरिक आपापल्या घरादाराची साफसफाई व रंगरंगोटीमध्ये व्यस्त दिसत असून नवरात्री पूर्वीपासून तालुक्यातील गावागावातील गल्लोगल्लीमध्ये रांगोळी विकण्यासाठी कोणी हात ठेल्यावर तर कोणी दुचाकी वर एक किंवा दोन रांगोळी विक्रेते फिरताना दिसायचे . मात्र आता दिवाळी जवळच आलीअसल्याने त्यांची संख्या अत्यंत वाढलेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!