‘प्रधानमंत्री पीक विमा योजना-रब्बी २०२४’ योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर :- ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना-रब्बी 2024’ मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे. ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत, गहू बागायत व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2024 तर उन्हाळी भात पिकासाठी 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेत केवळ 1 रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरुन पीक विमा पोर्टलवर विमा नोंदणीद्वारे सहभागी होता येणार आहे.

राज्यात खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राज्यात ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी 2025-26 हंगाम या तीन वर्षाकरिता अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून या तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हावार विमा कंपन्यांची नावे व टोल फ्री क्रमांक

वर्धा व नागपूर जिल्हयासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001037712 हा टोल फ्री क्रमांक आहे. भंडारा जिल्हयासाठी चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18002089200 हा टोल फ्री क्रमांक आहे. गोंदिया जिल्हयासाठी युनिर्व्हसल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18002005142/ 18002004030 हा टोल फ्री क्रमांक आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 1800118485 हा टोल फ्री क्रमांक आहेत. तर गडचिरोली जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली असून 18001024088 हा टोल फ्री क्रमांक आहे.

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश

हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील. पिकांचे होणारे नुकसान, पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमींचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत समावेश करण्यात आला आहे.

आधारकार्ड, 7/12 उतारा, 8 अ, आधार संलग्न बॅंक पासबुक या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंक शाखेत तसेच आपले सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी होता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

Fri Nov 29 , 2024
– उद्योजकांना १७.५ लाखापर्यंत अनुदान – नव उद्योजकांना ५० लाखापर्यंत कर्ज यवतमाळ :- राज्यातील युवक, युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे व त्याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत ५० लाखापर्यंत कर्ज व १७ लाख ५० हजारापर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात ग्रामीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com