मालमत्ता करात १० टक्के सुट  ३१ ऑक्टोबरपर्यंत लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर वसुली सुरु असून कर भरणा करतांना नागरीकांना लाभ व्हावा या दृष्टीने ३१ ऑक्टोबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १०% सुट देण्यात येणार आहे. परंतु सदर सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.

यापुर्वी सन २०२२-२३ मध्ये ज्या नागरीकांनी एकमुस्त चालु आर्थिक वर्षाचा मालमत्ता व इतर कराचा भरणा केला असल्यास अशा मालमत्ता धारकांनाही सुट देण्यात येईल, मात्र सदर सुटची रक्कम पुढील आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये समायोजीत करण्यात येणार आहे.

शहरातील मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात असुन याअंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत एकमुस्त भरणा केल्यास १० टक्के तर ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे.

एकुण मालमत्ता करत सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com