४४ नळ धारकांवर कपातीची कारवाई

– २४ जलमापक यंत्र ( मीटर ) जप्त

चंद्रपूर :- चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या ४४ नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन २४ जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.

शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत आहे. मीटर लावण्यात आलेल्या घरांपैकी केवळ १४ टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहे. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असुन अप्राप्त देयकांमुळे संपुर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते.सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अश्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

सुचनांचे पालन न करणाऱ्या नळ धारकांची नळ जोडणी कपात करण्याकरीता महानगरपालिकेमार्फत पथक तयार करण्यात आले आहे. आजपावेतो ०६ पथकाव्दारे कारवाई करण्यात आली असुन जे नळ धारक जलमापक काढुन पाणी भरत आहे अश्या १२५ नळ ग्राहकांची नोंद घेण्यात आली आहे. ४४ नळ धारकांवर नळ कपातीची करून २४ जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अश्या नळ ग्राहकांच्या पुनश्चः नळ जोडणीकरिता १ हजार रुपये शुल्क आकारणीचा भरणा केल्यावरच पुनश्चः नळ जोडणी करण्यात येणार असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उस्ताद झाकीर हुसेन यांनी जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले  - राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Mon Dec 16 , 2024
मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे. उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!