अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत घरासमोरील मोटारसायकल चोरी झाल्याची घटना तिरोडा येथील नेहरू वार्ड येथे घडली आहे.
फिर्यादी रवि चंदू बडवाईक वय 40 वर्ष राहणार नेहरू वार्ड तिरोडा यांच्या घरासमोरील लग्न समारंभ कार्यक्रम दरम्यान हिरो होंडा स्पेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH35- T 0636 अंदाजे 30 हजार किंमत असलेली मोटारसायकल अज्ञात चोरांनी पळविली. फियादीच्या लेखी रिपोर्ट वरून कलम 379 भादवी कलम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरांची गोपनीय माहिती तिरोडा पोलीस स्टेशनचे दिनेश तायडे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. गोपनीय माहीतीच्या आधारे मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपी शैलेश मनोहर हटवार वय 27 वर्ष राहणार कोयलारी याला ताब्यात घेऊन विचारले असता त्यांने मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. सदर चोरी केलेली मोटारसायकल त्यांच्या घरी वाडी मागे सापडली. सदर आरोपीला अटक करून मोटरसायकल जप्त करण्यात आली असुन पुढील तपास ना.पो.शी.श्रीराम टेंभरे करीत आहे.